वैद्यकीय शिक्षण व विशेष साहाय्य मंत्री हसन मुश्रीफ. File Photo
कोल्हापूर

'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' : मंत्री हसन मुश्रीफ मांडणार वैद्यकीय शिक्षणाचा लेखाजोखा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 'आवाज जनतेचा' हे ब्रीद घेऊन अल्पावधीतच महाराष्ट्रातील जनमानसावर अमिट छाप उमटवणाऱ्या 'पुढारी NEWS' ने 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर आधारित 13 ऑक्टोबर रोजी 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील उद्योग, महिला कल्याण, आरोग्य व कृषी या क्षेत्रातील सर्वांगिण विकासावर राज्यातील मंत्री, तज्ज्ञ, समाजसेवक, धोरणकर्ते आदी मान्यवरांकडून चर्चा या माध्यमातून होणार आहे. द फर्न हॉटेल, कोल्हापूर येथे हे विकास समिट होत असून, त्याचे थेट प्रक्षेपण पुढारी न्यूज चॅनेलवरुन होईल.

चर्चेतून आखला जाणार महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचा रोडमॅप....

'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' च्या माध्यमातून होणाऱ्या चर्चेत उद्योग, महिला कल्याण, आरोग्य आणि कृषी हे विषय केंद्रस्थानी असतील. यावेळी महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकास धोरणांचा राज्यातील मंत्री, समाजसेवक, धोरणकर्ते यांच्या चर्चेतून रोडमॅप आखला जाईल. यावेळी वैद्यकीय शिक्षण व विशेष साहाय्य मंत्री हसन मुश्रीफ या कार्यक्रमात सहभागी होत असून ते राज्‍याच्‍या वैद्यकीय शिक्षणाचा रोडमॅप मांडणार आहेत.

राज्‍यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी

राज्यातील नागरिकांना सर्वोत्त वैद्यकीय सुविधा मिळायच्या असतील, तर त्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाब असते ती म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता. हे लक्षात घेऊन राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एकाच शैक्षणिक वर्षात १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.

गडचिरोली, भंडारा, वाशिम, मुंबई, अमरावती, जालना, हिंगोली, अंबरनाथ, नाशिक येथे ही वैद्यकीय महाविद्यालये सुरू होतील. केंद्र सरकारने एक जिल्हा एक वैद्यकीय महाविद्यालय, असे धोरण स्वीकारले आहे, त्यानुसार ही महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. या दहा वैद्यकीय महाविद्यालयात मिळून एम.बी.बी.एस.च्या ९०० नव्या जागा निर्माण होतील. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना सरकारी महाविद्यालयात माफक दरात वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे.

कोल्हापुरात वैद्यकीय नगरी

कोल्हापुरात २००१पासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत आहेत. कोल्हापुरात तीन नवीन सुसस्ज रुग्णालये, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय कार्यालय, परिचारिका महाविद्याय यामुळे कोल्हापूर शहरातील शेंडापार्क येथे सुसज्य अशी वैद्यकीय नगरी साकारत आहे. या ठिकाणी सहाशे बेड्सचे सर्वसाधारण रुग्णालय, अडीचशे खाटांचे सुपर स्पेशॅलिटी रुग्णालय आणि अडीचशे खाटांचे कॅन्सर रुग्णालय हे तीन प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. याचा लाभ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT