कोल्हापूर : यादवनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेमध्ये बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ. समोर उपस्थित नागरिक.  
कोल्हापूर

kolhapur | गोरगरिबांना ठेच लागली तरी आमच्या नगरसेवकांना कळ येईल, असे ऋणानुबंध निर्माण करतील : मंत्री मुश्रीफ

यादवनगर, जवाहरनगर, प्रतिभानगर, राजेंद्रनगर येथे जाहीर प्रचारसभा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : लोकप्रतिनिधी आणि जनता हे नाते जीवाभावाचे असते. गोरगरिबांना ठेच जरी लागली तरी कळ आमच्या नगरसेवकांना येईल, असे ऋणानुबंध महायुतीचे सर्वच नगरसेवक निर्माण करतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ यादवनगर, जवाहरनगर, प्रतिभानगर, राजेंद्रनगर येथे झालेल्या जाहीर प्रचारसभांमधून मंत्री मुश्रीफ बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, गरिबांना सरकारी रुग्णालयात उपचार घेणे अधिक सोयीचे वाटते. हा विचार करूनच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे चित्र पालटले आहे. ही आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी महायुतीला पाठिंबा द्या. ते पुढे म्हणाले, रस्ते, गटर्स, घनकचरा प्रकल्प, सीसीटीव्ही, स्वच्छतागृहांची उभारणी यासोबतच अंबाबाई आणि जोतिबा विकास आराखडा राबवणे, यात्री निवास, हॉटेल्स, प्रवाशांसाठी भाडेतत्त्वावर फ्लॅट, पार्किंग सुविधा उत्तम करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरात येणार्‍या पर्यटकांना सेवा सुविधा उपलब्ध होतील. यावेळी विजय जाधव, विजय काळे यांचीही मनोगते झाली.

कल्याणकारी योजना घराघरापर्यंत राबवू

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून प्रभागनिहाय कोल्हापूर शहराचा विकास तर होईलच. दरम्यान; महायुतीचे सर्वच नगरसेवक नागरिकांच्या आणि विशेषत: गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना घराघरापर्यंत पोहोचतील. यामध्ये वृद्ध निराधार दिव्यांगांसाठी पेन्शन योजना, बांधकाम कामगार कल्याणकारी योजना, बेघरांना मजबूत पक्की घरे, विविध आरोग्याच्या योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT