नागाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील सांगली फाटानजीक सोमवारी पहाटे मिनी ट्रॅव्हल्सला अपघात झाल्याने १३ प्रवासी जखमी झाले.
पुणे येथील एका आयटी कंपनीतील कर्मचारी कर्नाटकातील गोकर्ण महाबळेश्वर दर्शन करून परत पुण्याकडे जात होते. तावडे हॉटेल पंचगंगा नदी ओलांडून पटेल हॉलसमोर गाडी आली असता चालकाला डुलकी लागून नियंत्रण सुटले व ट्रॅव्हल्स थेट समोरच्या ट्रेलरला धडकून थेट सेवा रस्त्यावर आली. यामध्ये ट्रॅव्हल्सच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.
जखमी असे : सायली शिंदे (वय २१), पवन शिंदे (२४ दोघे रा. संगमनेर), मयुरी देवरे (२१), गणेश देवरे (३०, दोघे रा. अहिल्यानगर), सुरभी वांगी (३०), माधुरी मोहिते (३०), प्रतीक्षा गायकवाड (२६), मोनाली गरपवार (४९), आदेश इंगळे, (२२), अनिकेत डोलारे (२३), प्रवीण शिंदे (२३, सर्व रा. पुणे), सुलक्षणी गायकवाड (२३, रा. कळवा, ठाणे), राज शिंकाले (२४, रा. नाशिक) अशी जखमींची नावे आहे. शिरोली एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सीपीआर येथे पाठविले.