Gokul milk | ‘गोकुळ’चे दूध संकलन 50-60 हजार लिटरने घटले; धोक्याची घंटा Pudhari File Photo
कोल्हापूर

Gokul milk | ‘गोकुळ’चे दूध संकलन 50-60 हजार लिटरने घटले; धोक्याची घंटा

मंत्री मुश्रीफ यांनी सुनावले; सभासदांनी संस्थेकडेच दूध घालावे

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘गोकुळ’वर प्रशासकराज सुरू झाल्यापासून दररोज 50 ते 60 हजार लिटर दूध संकलन कमी झाले आहे. वाढत्या उन्हाचेही कारण जरी असले, तरी ती धोक्याची घंटा आहे, अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुनावले. प्रशासक हा तीन महिन्यांचा पाहुणा आहे; पण ‘गोकुळ’ आपली मातृसंस्था आहे, ती कायम राहणार आहे. यामुळे सभासदांनी ‘गोकुळ’कडे दूध घालावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. ‘गोकुळ’च्या प्रशासकीय मंडळाला काम करू द्या, महत्त्वाचे प्रश्न असतील तरच सभासदांनी त्यांच्याकडे जावे, असे सांगत प्रशासकीय मंडळानेही ‘गोकुळ’च्या ब—ँडला कुठे धक्का लागणार नाही असे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आली लग्नघटिका समीप असे म्हटले की अक्षता पडतात, त्याच पद्धतीने आता ‘गोकुळ’चीही आली निवडणूक समीप अशीच स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकांनी राजकारणात पडू नये

प्रशासनातील काही अधिकारी राजकारणात पडत आहेत. थेट पोलिस बोलावण्याची भाषा करत आहेत. याबाबत मुश्रीफ म्हणाले, काहीजण ‘गोकुळ’च्या राजकारणात भाग घेत आहेत, त्यांनी तसे करू नये, असे आवाहन करत हा केला इशारा जाता जाता आहे, हेही त्यांनी समजून घ्यावे, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT