Murder Case | परप्रांतीय कामगारांमध्ये हाणामारी; तरुणाचा निर्घृण खून  Pudhari File Photo
कोल्हापूर

Murder Case | परप्रांतीय कामगारांमध्ये हाणामारी; तरुणाचा निर्घृण खून

पुढारी वृत्तसेवा

यड्राव : जुन्या वादातून परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या हाणामारीत संतोष गोपाल पांडा (वय 38, रा. ओडिशा) याचा निर्घृण खून करण्यात आला. लाकडी दांडके व पाईपने त्याच्या डोक्यात व तोंडावर मारहाण करण्यात आली. शहापूर पोलिस ठाण्यासमोरील तारदाळ हद्दीमध्ये यंत्रमाग कारखान्यात गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

या खूनप्रकरणी पोलिसांनी ताबसू बेहरा, शिवा बेहरा व मनोज बेहरा या तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कामाच्या कारणावरून दोन-तीन दिवसांपासून यांच्यामध्ये वाद सुरू होता. गुरुवारी मारामारी झाली. तीन ते चारजणांनी संतोषला बेदम मारहाण केली. मारहाणीत तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT