kolhapur | मिक्सर मशिनमध्ये अडकून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू 
कोल्हापूर

kolhapur | मिक्सर मशिनमध्ये अडकून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

शिरोली एमआयडीसीमधील कंपनीत घटना

पुढारी वृत्तसेवा

नागाव/शिरोली पुलाची : शिरोली एमआयडीसीमधील एका कंपनीत साफसफाईचे काम करत असताना अचानक मशिन सुरू झाल्याने त्यामध्ये अडकून 27 वर्षीय तरुण कामगाराचा मृत्यू झाला. सिकंदर भागीरथ पासवान (मूळ रा. बिहार, सध्या रा. शिरोली एमआयडीसी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास घडली.

सिकंदर एमआयडीसीमधील क्वालिटी कास्टिंग कंपनीत मेंटेनन्सचे काम करत होता. सोमवारी सकाळी तो बंद असलेल्या मिक्सर मशिनमध्ये शिरून साफसफाई करत असताना कोणीतरी अचानक मशिन सुरू केल्याने सिकंदर त्यामध्ये अडकला आणि गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने बेशुद्धावस्थेत शिरोली येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT