कोल्हापूर : कोल्हापुरात उष्णतेने उच्चांक गाठल्याने शहरवासीय घामाघूम झाले आहेत. मंगळवारी पार्याने उसळी घेत 38.9 अंश तापमानाची नोंद केली. यामुळे रखरखत्या उन्हाचा तडाखा जाणवत होता. दरम्यान, हवामान विभागाने बुधवार (दि. 15) पासून शुक्रवार (दि. 17) पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे उन्हाच्या तडाख्यात होरपळलेल्या कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आजपासून तीन दिवस पावसाची शक्यता
उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळण्याचा अंदाज
शहरात सकाळी 11 पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाचा अक्षरशः तडाखा जाणवत होता. वाढत्या तापमानासोबतच हवेतील आर्द्रता आणि किमान तापमानातील वाढीमुळे सायंकाळनंतरही वातावरणात प्रचंड दमटपणा जाणवत आहे.