कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (दि. 7 सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत हे शिबिर मंगळवार पेठेतील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. शिबिराचे संयोजन जिल्हा समन्वयक शिवसेना विनायक साळोखे, वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी केले आहे. शिबिरात अस्थिरोग, बालरोग, डोळे तपासणी, हृदयरोग, व्हेरीकोज वेन्स, जनरल सर्जरी, कर्करोग, कान तपासणी, मूत्रविकार, श्वसन विकार, जनरल मेडिसीन, मणक्याचे आजार, मेंदू रोग, रक्ताच्या चाचण्या, सांधे विकार, महिलांचे आजार आदींची तपासणी तज्ज्ञांद्वारे करण्यात येणार आहे. रुग्णांसोबत आयुष्मान भारत कार्ड असणे आवश्यक आहे.