Medical Store Fire | आळतेत औषध दुकानाला शॉर्टसर्किटने आग  (File Photo)
कोल्हापूर

Medical Store Fire | आळतेत औषध दुकानाला शॉर्टसर्किटने आग

पुढारी वृत्तसेवा

आळते : येथील ग्रामपंचायत समोरील असलेल्या कृष्णा मेडिकल या औषध दुकानाला रात्री साडेबाराच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. यात महागडी औषधे, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक मशिनरीसह रोख रक्कम असे एकूण २० लाखांचे साहित्य जळून खाक झाले. गणेश मंडळाच्या तरुणांनी सतर्कता दाखवल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत हातकणंगले पोलिसांनी पंचनामा करून घटनेची माहिती घेतली.

सुनील शामराव पाटील यांचे ग्रामपंचायतीसमोर कृष्णात मेडिकल नावाचे औषध दुकान आहे. पाटील हे नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास दुकानामधून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे पुढील चौकात बसलेल्या गणेश मंडळाच्या तरुणांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती तरुणांनी पाटील यांना दिली. तसेच महावितरण विभागाला याची माहिती देऊन विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, दुकानातील औषधांचा मोठा साठा, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह रोख रक्कम या आगीत जळून खाक झाली. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT