इचलकरंजी : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्वागत करताना शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने. सोबत पदाधिकारी. 
कोल्हापूर

'Gokul' election | इचलकरंजीत मुश्रीफ-माने यांच्यात खलबते

‘गोकुळ’ निवडणूक अनुषंगाने भेट : नव्या राजकीय समीकरणांची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी इचलकरंजीत शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची शिवसेना कार्यालय 'मातोश्री' येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भेट होऊन बंद खोलीत खलबते झाली.

शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने 72 ठराव दाखल केले आहेत त्यातच आज मंत्री मुश्रीफ यांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले यावेळी त्यांच्यात गोकुळच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नेत्यांमध्ये झालेल्या या चर्चेमुळे इचलकरंजीतील नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT