Vishalgad Meat Ban | विशाळगडावर मांसबंदीचे उल्लंघन; दोघांवर गुन्हा! Pudhari Photo
कोल्हापूर

Vishalgad Meat Ban | विशाळगडावर मांसबंदीचे उल्लंघन; दोघांवर गुन्हा!

पुढारी वृत्तसेवा

विशाळगड : ऐतिहासिक विशाळगडाचे पावित्र्य आणि धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी लागू असलेल्या मांसबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरोधात शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अजिम मजीद मुजावर (२९) व रज्जाक मजीद मुजावर (३१, दोघे रा. विशाळगड, ता. शाहूवाडी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून अंदाजे ८ हजार रुपये किमतीचे सुमारे २५ किलो मांस हस्‍तगत करण्‍यात आले. हा प्रकार समोर आल्‍यावर हिंदुत्‍ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्‍याने मोठा तणाव निर्माण झाला.

शनिवारी (दि. २८) सायंकाळी पाचच्या सुमारास विशाळगड परिसरात हा प्रकार घडला. विशाळगडावरील सार्वजनिक ठिकाणी पशुपक्ष्यांची हत्या, बळी देणे तसेच संरक्षित स्मारकांच्या परिसरात मांस शिजविण्यास मनाई करणारे न्यायालयीन आदेश व पुरातत्त्व विभागाचे नियम लागू आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या २३ जुलै १९९८ रोजीच्या आदेशाचाही यासंदर्भात आधार घेण्यात आला आहे.या आदेशाचे उल्लंघन करून मांस विशाळगडावर नेले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिस शिपाई विलास निवृत्ती शिंदे यांनी शाहूवाडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल, जामिनावर सुटका

शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. संशयीतांना जामिनावर सोडले असून त्‍यांना सोमवारी शाहूवाडी पोलिस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

विशाळगडावर घडलेल्या मांस वाहतुकीच्या प्रकाराचे पडसाद उमटू लागले आहेत. गडावर मांस नेण्यास बंदी असूनही मांसाची वाहतूक झाल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना तीव्र नाराज झाल्‍या असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्‍याची मागणी जोर धरत आहे. गडावर बंदी असताना असा प्रकार घडतोच कसा, पोलिस बंदोबस्त असूनही नियमांचे उल्लंघन कसे झाले, बंदोबस्त नेमका कशासाठी तैनात केला आहे, असे सवाल हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT