कोल्हापूर ः 1) महायुतीचे नगरसेवक भगवे फेटे परिधान करून महापालिकेत दाखल झाले. 2) ‘मविआ’चे नगरसेवक डोक्यावर गांधी टोपी परिधान करून महापालिकेत आले. 
कोल्हापूर

Mayor, Deputy Mayor Elections | भगवे फेटे अन् गांधी टोपीने वेधले लक्ष

महायुतीचे नगरसेवक फेटा बांधून, ‘मविआ’चे नगरसेवक टोपी परिधान करून महापालिकेत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी महायुतीचे नगरसेवक भगवे फेटे बांधून, तर महाविकास आघाडीचे नगरसेवक गांधी टोपी परिधान करून महापालिकेत आले. त्यांच्या महापालिकेतील प्रवेशादरम्यान भगवे फेटे अन् गांधी टोपीने सर्वांचे लक्ष वेधले. दरम्यान, महायुतीच्या महापौर, उपमहापौरपदाच्या उमेदवारांचे सारथ्य खासदार धनंजय महाडिक यांनी केले; तर काँग्रेसचे नगरसेवक अजिंक्यतारा कार्यालयातून बसने महापालिकेत दाखल झाले.

भाजप, शिवसेनेचे नगरसेवक भाजपच्या नागाळा पार्क येथील जिल्हा कार्यालयातून सकाळी साडेदहा वाजता खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत खासगी बसमधून महापालिकेत आले; तर राष्ट्रवादीचे चार नगरसेवक चारचाकीमधून दाखल झाले. त्यापाठोपाठ दहा मिनिटांनी महाविकास आघाडीचे नगरसेवकही खासगी बसमधून महापालिकेत आले. प्रवेशादरम्यान महायुतीच्या नगरसेवकांनी डोक्यावर भगवा फेटा, तर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पांढरी टोपी परिधान केली होती. दहा वाजून चाळीस मिनिटांनी महायुतीच्या, तर दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडीसाठी महापालिकेत प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी प्रत्येकाचे ओळखपत्र तपासून त्यांना महापालिकेत प्रवेश दिला.

नेते, पदाधिकार्‍यांचा एकत्र नाश्ता

महायुतीच्या नगरसेवकांनी महापालिकेत प्रवेश केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, काही माजी नगरसेवक यांनी महापालिका परिसरातील एका हॉटेलमध्ये एकत्रित नाश्ता केला.

नेत्यांच्या वाहनातून महायुतीचे उमेदवार

महापौर, उपमहापौर निवडीसाठी महापौरपदाच्या भाजपच्या उमेदवार रूपाराणी निकम, उपमहापौरपदाचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अक्षय जरग यांना घेऊन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर व खासदार धनंजय महाडिक सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास महापालिकेत दाखल झाले. यावेळी उमेदवार असलेल्या वाहनाचे सारथ्य खासदार महाडिक यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT