Kolhapur News File photo
कोल्हापूर

Kolhapur News: हृदयद्रावक! हिरण्यकेशी नदीत मामा-भाच्याचा बुडून मृत्यू

कोवाडे (ता. आजरा) येथील हिरण्यकेशी नदीत बुडून मामा व भाच्याचा एकाचवेळी मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur News

आजरा : कोवाडे (ता. आजरा) येथील हिरण्यकेशी नदीत बुडून मामा व भाच्याचा एकाचवेळी मृत्यू झाला. सुनील विष्णू सुतार (वय ५५, कोवाडे) आणि प्रविण पांडुरंग सुतार (रा. वाळकी) अशी त्यांची नावे आहेत.

भाचा प्रविण यांच्या सास-याचा हिरलगे (ता.गडहिंग्लज) येथे सोमवारी (दि ११) दुपारी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी दोघेही गेले होते. कार्यक्रमानंतर दोघे मोटरसायकलवरून कोवाडे येथे येत होते. हिरलगे व कोवाडेच्या मध्ये हिरण्यकेशी नदी असल्याने मोटरसायकल लाऊन दोघे नदीतून चालत कोवाडेच्या दिशेने जात होते. यावेळी चालत असताना एकजण पाय घसरून पडला. त्याला वाचवत असताना दुसराही पडला. यामध्ये दोघेही वाहून गेले. दरम्यान आज सकाळी दोघांचा मृतदेह आढळून आले.

अलमट्टी, हिप्परगीतून योग्य विसर्गासाठी अधिकारी नेमा

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पुराला अलमट्टी आणि हिप्परगी धरणातील पाणी कारणीभूत ठरते, हे स्पष्ट आहे. यामुळे यावर्षी या दोन्ही धरणांतून पाण्याचा योग्य आणि वेळेवर विसर्ग होईल, याकरिता स्वतंत्र अधिकारी नेमा, त्यांच्या विसर्गांवर स्ट्राँग मॉनिटरिंग करा, या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्या, कर्नाटकशी समन्वय साधा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाला दिले.

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमवेत लवकरच बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आबिटकर यांनी आढावा बैठक घेतली. आबिटकर म्हणाले, अलमट्टी आणि हिप्परगीतील विसर्ग हा मुद्दा महत्त्वाचा आहे, तो टॉप प्रॉयोरिटी म्हणूनच बघा. या दोन्ही धरणांतून पाण्याचा योग्य प्रमाणात विसर्ग झाला पाहिजे. याकरिता स्वतंत्र यंत्रणा तैनात करा. त्याचे नियोजन करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT