Ethanol tanker fire: इथेनॉल टँकरला भीषण आग  Pudhari
कोल्हापूर

Ethanol tanker fire: इथेनॉल टँकरला भीषण आग

फायर बिगेडच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

साळवण : कागलमधून इथेनॉल घेऊन गोव्याच्या दिशेने निघालेल्या टँकरला टायर फुटल्याने भीषण आग लागल्याची घटना साळवण ते मार्गेवाडीच्या वळणावर मंगळवारी सायंकाळी घडली. टँकरमध्ये सुमारे 40 हजार लिटर इथेनॉल भरलेले होते. मात्र, फायर ब्रिगेडच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती.

टँकरच्या चाकाचा टायर फुटून घर्षणामुळे पेट घेतल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून आग लागल्याचे लक्षात येताच टँकर चालकाने प्रसंगावधान राखत वाहन तातडीने रस्त्याच्या कडेला थांबवले व 101 आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून अग्निशमन दलाला पाचारण केले. यानंतर मार्केट यार्ड, कोल्हापूर येथील फायर बिगेडची वाहने तसेच छत्रपती शाहू साखर कारखान्याची फायर बिगेड वाहने घटनास्थळी दाखल झाली.

दरम्यान, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे मोठमोठे धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रथमदर्शनी स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT