उत्तूर : आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी तसेच तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश सुरेश नाईक, सुरेश बाबू नाईक, जनाबाई सुरेश नाईक (रा. बहिरेवाडी, ता. आजरा), प्रकाश मारुती नाईक व महादेवी प्रकाश नाईक (रा. बेरडवाडी, ता. कागल) अशी त्यांची नावे आहेत. हा प्रकार १४ मार्च २०२६ ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत बहिरेवाडी येथे घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पीडित मुलगी अल्पवयीन असून तिचा विवाह झाल्याचे चौकशीत समोर आले. बालकल्याण समितीच्या पत्रानुसार कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मुलगी विवाहाच्या वेळी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तक्रारीनुसार ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत मंजली रोहिदास चौगुले (ग्रामपंचायत अधिकारी) यांनी आजरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास जमादार करीत आहेत.