Bribe case | 7/12 वर नाव नोंदीसाठी 60 हजार घेताना मंडल अधिकारी जाळ्यात 
कोल्हापूर

Bribe case | 7/12 वर नाव नोंदीसाठी 60 हजार घेताना मंडल अधिकारी जाळ्यात

नांदणी येथे कारवाई; पंटरही ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

शिरोळ : सात-बारावर नाव नोंदवून देण्यासाठी 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना नांदणी येथील मंडल अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मंडल अधिकारी अमितकुमार जगन्नाथ पाडळकर (वय 44, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) आणि खासगी व्यक्ती शिवाजी आनंदराव जाधव (61, रा. धरणगुत्ती) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

संशयितांनी 1 लाख 25 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 60 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. 18 मे रोजी पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून 60 हजार रुपये स्वीकारताच ‘एसीबी’ने दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT