Government Land Scam | सरकारी जमीन विक्रीप्रकरणी मंडल अधिकार्‍यासह दोन तलाठी निलंबित File Photo
कोल्हापूर

Government Land Scam | सरकारी जमीन विक्रीप्रकरणी मंडल अधिकार्‍यासह दोन तलाठी निलंबित

अपर जिल्हाधिकार्‍यांचा बनावट आदेश तयार करणारा मुख्य संशयित आरोपी तातोबा गावडा १७ दिवसांपासून फरार

पुढारी वृत्तसेवा

चंदगड : उपजिल्हाधिकारी यांचा बनावट आदेश तयार करून मळवीवाडी (ता. चंदगड) येथील १२ एकर सरकारी जमीन विक्री झाल्याप्रकरणी तुर्केवाडी मंडल अधिकार्‍यासह दोन तलाठ्यांना जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या निर्देशानुसार निलंबित केले आहे.

या प्रकरणात बनावट आदेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला तातोबा भिकाजी गावडा (रा. मुगळी, ता. चंदगड) हा संशयित मागील १७ दिवसांपासून फरार आहे. या प्रकरणाचा तपास गडहिंग्लज उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील करत आहेत. याप्रकरणी तुर्केवाडी (ता. चंदगड) मंडल अधिकारी बाळासो सरगर, तुडये सज्‍जाचे (ता. चंदगड) तलाठी गणेश रहाटे, सुरुते सज्जाचे (ता. चंदगड) तलाठी अशोक बुरूड या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मळवीवाडी येथील चार भोगवटादार शेतकरी यांना अंधारात ठेवून १२ एकर शासकीय जमीन अपर जिल्हाधिकारी यांचा वर्ग-दोनमधून वर्ग-एकचा बनावट आदेश तयार करून तिसर्‍याच एका व्यक्तीला विक्री करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT