kolhapur News| शाळकरी मुलीचा विनयभंग, अपहरण; तरुणास सात वर्षांची सक्तमजुरी 
कोल्हापूर

kolhapur News| शाळकरी मुलीचा विनयभंग, अपहरण; तरुणास सात वर्षांची सक्तमजुरी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शाळकरी मुलीस वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन तिचे अपहरण करून विनयभंग केल्याप्रकरणी तरुणास विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. आय. पेरमपल्ली यांनी मंगळवारी (दि. ७) दोषी ठरवून सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. विशाल मारुती कांबळे (वय २४, रा. मळगे बुद्रुक, ता. कागल) असे त्याचे नाव आहे. सरकारी वकील म्हणून ॲड. एस. एस. इंगळे यांनी काम पाहिले. २९ मार्च २०२२ रोजी ही घटना घडली होती.

२९ मार्च २०२२ रोजी पीडित मुलगी शाळेस निघाली होती. यावेळी विशाल कांबळे याने तिचा पाठलाग करून वाटेतच थांबविले. पीडितेला वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला. तसेच तिचे अपहरण केले. या प्रकरणी मुरगूड पोलिसांनी शोध घेऊन विशाल कांबळे याला भुईंज (सातारा) येथून ताब्यात घेतले. त्याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम, अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी वकील एस. एस. इंगळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून विशाल कांबळेस विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस.आय.पेरमपल्ली यांनी दोषी ठरविले. त्याला ७ वर्षे शिक्षा व ५ हजार रुपयांचा दंड सुनावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT