Morning Walk Accident | मॉर्निंग वॉकला गेलेल्या एकाचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू 
कोल्हापूर

Morning Walk Accident | मॉर्निंग वॉकला गेलेल्या एकाचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

पाचगाव : कळंबा येथील बापूरामनगर परिसरातील बाबुराव शंकर गोसावी (वय ५३) यांचा रविवारी (दि. ९) मॉर्निंग वॉकला गेले असताना कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, गोसावी हे रविवारी सकाळी सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. कळंबा गावच्या हद्दीत एका कार वॉश सेंटरजवळ ते आले असता गारगोटीहून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या कारने (एमएच ४२ बीडब्ल्यू ६१२३) त्यांना जोराची धडक दिली. कारचालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात झाला. या धडकेमध्ये गंभीर जखमी झालेल्या बाबुराव गोसावी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालकाने वाहन घटनास्थळावरच सोडून पळ काढला. याप्रकरणी राजाराम शंकर गोसावी यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार गडकरी अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT