Friend’s House Robbery | मित्राच्याच घरी चोरी करणाऱ्यास १.१० लाखांच्या मुद्देमालासह अटक  Pudhari File Photo
कोल्हापूर

Friend’s House Robbery | मित्राच्याच घरी चोरी करणाऱ्यास १.१० लाखांच्या मुद्देमालासह अटक

पुढारी वृत्तसेवा

मुरगूड; पुढारी वृत्तसेवा : बिद्री (ता. कागल) येथे मित्र म्हणून मित्राच्या घरी चार ते पाच दिवस मुक्काम करून १ लाख १० हजार किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणारा भामटा मित्र विनोद नारायण सुतार (वय २९, रा. हळदी, ता. कागल) या अट्टल चोरट्यास मुरगूड पोलिसांनी अटक केली.

अधिक माहिती अशी : हळदी येथील विनोद सुतार हा बिद्री येथील महादेव शंकर खराडे यांच्या मुलग्याचा मित्र आहे. मित्रत्वाच्या नात्याने घरी आलेल्या विनोदने तेथेच चार दिवस वास्तव्य करीत पाचव्या दिवशी घरी कोणी नसल्याचा अंदाज घेत घरातील लोखंडी तिजोरी उघडून त्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. पोलिसांनी सापळा लावून या चोरट्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT