कोल्हापूर : साथीदाराच्या मदतीने मोलकरणीने नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून राजारामपुरी पोलिसांनी वैशाली सिद्धाप्पा भुमन्नावर (रा. प्रतिभानगर) व तिचा साथीदार रवी यांना अटक केली.
राहुल नारायण हावळ (39, रा. राजारामपुरी) यांचा सराफ व्यवसाय आहे. ते पूर्वी प्रतिभानगर येथील नलवडे कॉलनीत वास्तव्यास होते. 9 जानेवारी ते 20 फेब—ुवारीदरम्यान घर बदलून ते भारत हौसिंग सोसायटीत राहण्यास आले. घरातील साहित्य स्थलांतर करताना ड्रॉवरमध्ये सुमारे नऊ तोळ्यांचा ऐवज गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. घरकाम करणारी वैशाली भुमन्नावर हिच्यावर संशय आल्याने हावळ यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर वैशालीने साथीदाराच्या मदतीने दागिने चोरल्याची कबुली दिली.