कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत महायुतीने तिन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवारांना ताटकळत ठेवले. मात्र, तिकीट कन्फर्म असलेल्या मर्जीतील उमेदवारांना तिन्ही पक्षांतील नेत्यांनी रात्रीत पक्षांचे एबी फॉर्म देऊन ग्रीन सिग्नल दिला. परिणामी, एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत संपल्यानंतर मंगळवारी (दि. 30) सायंकाळी 5.18 वाजता उमेदवार यादी जाहीर केली. महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही घटक पक्षांकडून 42 नव्या चेहर्यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. 24 माजी नगरसेवकांनाही संधी दिली आहे.
42 माजी नगरसेवकांचा पत्ता कट
महायुतीने गतवेळच्या समीकरणानुसार फक्त 10 माजी नगरसेवकांना भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीने उमेदवारी दिली, तर 42 माजी नगरसेवकांचा पत्ता कट केला.
11 माजी नगरसेवकांच्या नातेवाईकांना उमेदवारी
महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होत आहे. परिणामी, एकेक प्रभाग 24 ते 30 हजार मतदारांचा झाला आहे. अनेक ठिकाणी इच्छा असूनही माजी नगरसेवकांना आरक्षण बदलल्याने निवडणूक लढविता आलेली नाही. परिणामी, महायुतीने 11 माजी नगरसेवकांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. त्यात माजी नगरसेविकेचा पती, मुलगा, माजी नगरसेवकाची पत्नी आदींचा समावेश आहे.
आमदार, माजी आमदारांचे पुत्र रणांगणात
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर आणि माजी आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव हे सुद्धा महापालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरून अचानक माघार घेतलेल्या प्रभागात त्यांच्याऐवजी भाजपने विजयेंद्र माने यांना उमेदवारी दिली आहे. आ. क्षीरसागर यांचे मेहुणे विश्वजित मोहिते हेसुद्धा या जागेसाठी आग्रही होते. आता त्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांच्या पत्नी वंदना मोहिते यांना भाजपकडून या प्रभागात उमेदवारी देण्यात आली.
दोन माजी महापौर, महापौरांचे पती, पुत्र, सून मैदानात
कोल्हापूरच्या माजी महापौर हसीना बाबू फरास व माधवी प्रकाश गवंडी या दोन माजी महापौर पुन्हा रणांगणात उतरल्या आहेत. त्याबरोबरच माजी महापौर सुनील कदम यांचे पुत्र स्वरूप कदम आणि माजी महापौर सई खराडे यांचे पुत्र शिवतेज खराडे मैदानात उतरले आहेत. माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे पती अश्किन आजरेकर आणि माजी महापौर दीपक जाधव यांच्या सून सृष्टी करण जाधव हेसुद्धा निवडणूक लढवत आहेत.
उमेदवारांची नावे अशी -
प्रभाग क्र. 1 - अ - अनुसूचित जाती - अमर भगवान साठे (शिवसेना), ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - अंजली अशोक जाधव (शिवसेना), क - सर्वसाधारण महिला - प्रियांका प्रदीप उलपे (शिवसेना), ड - सर्वसाधारण - कृष्णा दिलीप लोंढे (शिवसेना).
प्रभाग क्र. 2 - अ - अनुसूचित जाती - वैभव दिलीप माने (शिवसेना), ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - अर्चना उमेश ऊर्फ राजू पागर (शिवसेना), क - सर्वसाधारण महिला - प्राजक्ता अभिषेक जाधव (शिवसेना), ड - सर्वसाधारण - स्वरूप सुनील कदम (शिवसेना).
प्रभाग क्र. 3 - अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग - प्रमोद भगवान देसाई (भाजपा), ब - सर्वसाधारण महिला - वंदना विश्वजित मोहिते (भाजप), क - सर्वसाधारण महिला - राजनंदा महेश महाडिक (भाजपा), ड - सर्वसाधारण - विजयेंद्र विश्वासराव माने (भाजप).
प्रभाग क्र. 4 - अ अनुसूचित जाती - योगीता प्रवीण कोडोलीकर (राष्ट्रवादी) व शुभांगी रमेश भोसले (शिवसेना), ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग - दिलीप हणमंत पोवार (भाजप), क - सर्वसाधारण महिला - सुमिता मारुती माने (शिवसेना), ड - सर्वसाधारण - संजय बाबुराव निकम (भाजप).
प्रभाग क्र. 5 - अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग - अनिल हिंदुराव अधिक (शिवसेना), ब - सर्वसाधारण महिला - मनाली धीरज पाटील (भाजप), क - सर्वसाधारण महिला - पल्लवी नीलेश देसाई (भाजपा), ड - सर्वसाधारण - समीर सदाशिव यवलुजे (शिवसेना).
प्रभाग क्र. 6 - अ - अनुसूचित जाती - सोनुले शीला अशोक (शिवसेना), ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - माधवी प्रकाश गवंडी (राष्ट्रवादी), क - सर्वसाधारण महिला - दीपा दीपक काटकर (भाजप), ड - सर्वसाधारण - नंदकुमार बाळकृष्ण मोरे (शिवसेना).
प्रभाग क्र. 7 - अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग - विशाल किरण शिराळे (भाजपा), ब - सर्वसाधारण महिला - दीपा अजित ठाणेकर (भाजपा), क - सर्वसाधारण महिला - मंगल महादेव साळोखे (शिवसेना), ड - सर्वसाधारण - ऋतुराज राजेश क्षीरसागर (शिवसेना).
प्रभाग क्र. 8 - अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - अनुराधा सचिन खेडकर (शिवसेना), ब - सर्वसाधारण महिला - शिवानी संजय पाटील (भाजपा), क - सर्वसाधारण - अमिता हेमंत कांदेकर (राष्ट्रवादी), ड - सर्वसाधारण - शिवतेज अजित खराडे (शिवसेना).
प्रभाग क्र. 9 - अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग - विजयसिंह ऊर्फ रिंकू वसंतराव देसाई (भाजप), ब - सर्वसाधारण महिला - संगीता संजय सावंत (शिवसेना), क - सर्वसाधारण महिला - माधवी मानसिंग पाटील (भाजप), ड - सर्वसाधारण - शारंगधर वसंतराव देशमुख (शिवसेना).
प्रभाग क्र. 10 - अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग - अजय पांडुरंग इंगवले (शिवसेना), ब - सर्वसाधारण महिला - पूर्वा सागर राणे (भाजप), क - सर्वसाधारण महिला - अर्चना उत्तम कोराणे (भाजप), ड - सर्वसाधारण - महेश आबासो सावंत (राष्ट्रवादी).
प्रभाग क्र. 11 - अ - अनुसूचित जाती महिला - निलांबरी गिरीष साळोखे (भाजपा), ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - यशोदा प्रकाश मोहिते (राष्ट्रवादी), क - सर्वसाधारण - सत्यजित चंद्रकांत जाधव (शिवसेना), ड - सर्वसाधारण - माधुरी किरण नकाते (भाजपा).
प्रभाग क्र. 12 - अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग - अश्कीन गणी आजरेकर (शिवसेना), ब - सर्वसाधारण महिला - संगीता रमेश पोवार (शिवसेना), क - सर्वसाधारण महिला - हसीना बाबू फरास (राष्ट्रवादी), ड - सर्वसाधारण - आदिल बाबू फरास (राष्ट्रवादी).
प्रभाग क्र. 13 - अ - अनुसूचित जाती महिला - माधुरी राजेश व्हटकर (भाजप), ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - रेखा रामचंद्र उगवे (भाजप), क - सर्वसाधारण - नियाज असिफ खान (राष्ट्रवादी), ड - सर्वसाधारण - ओंकार संभाजी जाधव (शिवसेना).
प्रभाग क्र. 14 - अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - प्रेमा शिवाजी डवरी (राष्ट्रवादी), ब - सर्वसाधारण महिला - निलिमा शैलेश पाटील (भाजप), क - सर्वसाधारण - प्रकाश रामचंद्र नाईकनवरे (शिवसेना), ड - सर्वसाधारण - अजित जयसिंग मोरे (शिवसेना).
प्रभाग क्र. 15 - अ - अनुसूचित जाती - मोहिनी जयदीप घोटणे (भाजप), ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - जस्मिन आजम जमादार (राष्ट्रवादी), क - सर्वसाधारण महिला - सृष्टी करण जाधव (भाजप), ड - सर्वसाधारण - दुर्गेश उदयराव लिंग्रस (शिवसेना).
प्रभाग क्र. 16 - अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग - विलास भैरू वास्कर (भाजप), ब - सर्वसाधारण महिला - अपर्णा रोहित पोवार (भाजप), क - सर्वसाधारण महिला - पूजा सतीश पोवार (भाजप), ड - सर्वसाधारण - मुरलीधर पांडुरंग जाधव (भाजप).
प्रभाग क्र. 17 - अ - अनुसूचित जाती महिला - प्रियांका विश्वविक्रम कांबळे (राष्ट्रवादी), ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग - रवींद्र कल्लापा मुतगी (राष्ट्रवादी), क - सर्वसाधारण महिला - जाहिदा राजू मुजावर (राष्ट्रवादी), ड - सर्वसाधारण - राजेंद्र रामचंद्र पाटील (राष्ट्रवादी).
प्रभाग क्र. 18 - अ - अनुसूचित जाती महिला - शिवानी स्वप्निल गुर्जर (राष्ट्रवादी), ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - कैसर इस्माईल बागवान (शिवसेना), क - सर्वसाधारण - रूपाराणी संग्रामसिंह निकम (भाजप), ड - सर्वसाधारण - बबन ऊर्फ अभिजित आप्पासाहेब मोकाशी (भाजप).
प्रभाग क्र. 19 - अ - अनुसूचित जाती - राहुल भालचंद्र चिकोडे (भाजप), ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - मानसी सतीश लोळगे (राष्ट्रवादी), क - सर्वसाधारण महिला - रेणू युवराज माने (भाजप), ड - सर्वसाधारण - विजयसिंह पांडुरंग खाडे-पाटील (भाजप).
प्रभाग क्र. 20 - अ - अनुसूचित जाती महिला - सुषमा संतोष ऊर्फ राजू जाधव (भाजप), क - नागरिकांचा मागास प्रवर्ग - वैभव अविनाश कुंभार (भाजप), ड - सर्वसाधारण महिला - नेहा अभय तेंडुलकर (भाजप), इ - सर्वसाधारण - अभिजित शामराव खतकर (शिवसेना).
दरम्यान, सुरेखा ओवटकर व सुप्रिया वाडकर या दोघींना भाजपने एबी फॉर्म दिले असून, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोघींपैकी कोण माघार घेणार की नाही? ते माघारीनंतरच स्पष्ट होईल. अन्यथा पहिला एबी फॉर्म भरला असेल त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. त्यांच्यानंतर भरलेला अर्ज बाद ठरेल.