कोल्‍हापूर : महायुतीच्‍या नेत्‍यांनी शहरातील एका हॉटेलमध्‍ये रविवारी एकत्रित स्‍नेहभोजन केले.  
कोल्हापूर

kolhapur | मुश्रीफ, आबिटकर कुठे आहेत? मंत्री पाटील यांच्‍याकडून विचारपूस

शहरातील एका हॉटेलमध्‍ये महायुती नेत्‍यांचा तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर दौर्‍यावर नुकतेच येऊन गेलेले केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा दौरा यशस्‍वी झाल्‍याबद्दल महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा रविवारी (दि. २८) शहरातील एका हॉटेलमध्‍ये स्‍नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमासाठी उच्‍च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रथम उपस्‍थिती लावली. तेव्‍हा हॉटेलमध्‍ये त्‍यांना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर दिसले नाहीत. त्‍यांनी अन्‍य पदाधिकार्‍यांना मुश्रीफ, आबिटकर कुठे आहेत, अशी विचारणा केली. फोनवरून संपर्क साधत ते कुठेपर्यंत पोहोचलेत याची माहिती घेतली. दरम्‍यानच्‍या काळात त्‍यांनी उपस्‍थित असलेले महायुतीचे अन्‍य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची विचारपूस केली. यानंतर मंत्री मुश्रीफ, मंत्री आबिटकर हॉटेलमध्‍ये दाखल झाल्‍यानंतर महायुतीच्‍या सर्व नेत्‍यांनी कोणतीही राजकीय चर्चा न करता एकत्रित भोजन केले. मंत्री मुश्रीफ, मंत्री आबिटकर यांनी शाकाहारी भोजनाचा आस्‍वाद घेतला, तर मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार संजय घाटगे, जनसुराज्‍यचे समित कदम यांच्‍यासह प्रमुख पदाधिकार्‍यांनी तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव मारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT