कोल्हापूर : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळातही शहराच्या रखडलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची धमक महायुतीमध्येच आहे. त्यासाठी आवश्यक सक्षम नेतृत्व महायुतीकडे असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ यांनी केले. ते प्रभाग क्रमाक 9 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बिडी कॉलनी येथे झालेल्या सभेत बोलत होते. वैशिष्ट्य म्हणजे या सभेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृश्य प्रलालीद्वारे उपस्थिती होती.
उपनगरातील बी.डी. कॉलनी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या सभेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विविध कॉलन्यांमधील नागरिकांनी सभेला उपस्थित राहून महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. परिसरातील नागरी सुविधा, विकासकामे महायुतीचे उमेदवार पूर्णत्वास नेतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
महायुतीकडे अनुभवसंपन्न नेतृत्व असून शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेली ताकद आणि समन्वय महायुतीकडे आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये नव्याने बदल घडवून आणण्यासाठी महायुतीचे उमेदवार सक्षम असून, त्यांच्या माध्यमातून परिसरातील प्रश्न मार्गी लागतील, तसेच महायुतीचे सर्व उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सभेस शारंगधर देशमुख, मानसिंग पाटील, विजय देसाई, संजय सावंत, इजाज नागरकट्टी, गुलाब पठाण, दाऊद शेख, विशाल पांडे, प्रशांत सुतार, फारूक हवालदार, अरुण सुतार, तोफीक कांडेकरी, साद बागवान, नईम भिस्ती, शकील जत्राटे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
दूरदृष्य प्रणालीद्वारे उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
कोल्हापूर शहराच्या विकासाकरिता महायुती म्हणून रचनात्मक विकास करणार असून येथील प्रलंबित सर्व विकास कामांना न्याय देण्याचे काम शासन म्हणून करण्याची जबाबदारी आमची आहे. महायुतीच्या माध्यमातून उभे केलेल्या सर्वांच्या सर्व 81 विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.