कोल्हापूर : येथील महावीर महाविद्यालयातील एनसीसी छात्र समर्थ कृष्णात पाटील यांची २६ जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथ येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड आणि पंतप्रधान रॅलीसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर आणि पुणे येथील चार शिबिरात केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर कॅडेट समर्थ पाटील याची निवड झाली आहे.
कॅडेट समर्थ पाटील हा पन्हाळा तालुक्यातील पुनाळ येथील ग्रामीण भागातील आहे. त्याला चेअरमन ॲड.के.ए. कापसे, सचिव एम.बी. गरगटे, लेफ्टनंट कर्नल एम. मुठांना, माजी प्राचार्य आर.पी लोखंडे, प्र.प्राचार्या डॉ. उषा पाटील, कॅप्टन उमेश वांगदरे, कॅप्टन डॉ.सुजाता पाटील, सुभेदार मेजर शिवा बालक याचें प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.