मंत्री हसन मुश्रीफ (File photo)
कोल्हापूर

Hasan Mushrif | राज्‍य सरकार येत्या दोन-तीन दिवसात दुष्काळ जाहीर करणार : मंत्री हसन मुश्रीफ

शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये

पुढारी वृत्तसेवा

सेनापती कापशी : पावसाअभावी पिके संकटात आली आहेत. या नैसर्गिक संकटात सरकार शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सरकार येत्या दोन-तीन दिवसात दुष्काळ जाहीर करणार असून शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्‍हणाले.हसूर खुर्द (ता. कागल) येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. लवकरच कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पिकांचे पंचनामे करणार आहेत. ज्या-ज्या शेतकर्‍यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. त्या-त्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही.

यावेळी माजी आ. संजय घाटगे, माजी सरपंच अंकुश पाटील, विनायक जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शशिकांत खोत, सुनिल चौगले, सूर्याजी घोरपडे, धनाजी तोरस्कर, दीपक सोनार, आनंदा जाधव, ए. जी. साळोखे यांच्यासह ग्रा. पं. सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संस्थेने उपस्थित होते. सरपंच सुभाष गडकरी यांनी स्वागत केले. विशाल जाधव यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT