महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने मंगळवारी पुकारलेला महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित केला आहे. Pudhari News Network
कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा मंगळवारचा बंद स्थगित

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने मंगळवारी (दि.२७) पुकारलेला एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित केल्याची माहिती कृती समितीतर्फे ललित गांधी यांनी दिली आहे. (Maharashtra State Traders Bandh)

राज्यस्तरीय कृती समितीच्या बंदची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार माधुरीताई मिसाळ व पणन, वित्त सहकार- नगरविकास विभागाचे मुख्य सचिव, पणन संचालक व विविध विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT