राधानगरी धरण 
कोल्हापूर

Kolhapur News : राधानगरी धरणाच्या मुख्य भिंतीची घनता, कार्यक्षमता तपासणी

पुण्याच्या 'सीडब्ल्यूपीआरएस' पथकाकडून विशेष पाहणी; दहा ठिकाणी 'कोर ड्रिलिंग' करून घेतले काँक्रीटचे नमुने

पुढारी वृत्तसेवा

राधानगरी : ऐतिहासिक आणि राज्याच्या जलसंपदेत महत्त्वाचे स्थान असलेल्या राधानगरी धरणाच्या मुख्य भिंतीची घनता व संरचनात्मक कार्यक्षमता तपासण्यासाठी पुणे येथील केंद्रीय वीज आणि पाणी संशोधन केंद्राच्या (CWPRS) तज्ज्ञ पथकाने नुकतीच पाहणी केली. धरण पूर्ण झाल्यानंतर प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही विशेष तपासणी करण्यात आली.

या तपासणीदरम्यान धरणाच्या मुख्य भिंतीवर विविध ठिकाणी दहा होल (कोर ड्रिलिंग) करण्यात आले. या होलमधून काँक्रीटचे नमुने घेऊन तसेच आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने भिंतीची घनता, मजबुती, अंतर्गत स्थिती आणि एकूण कार्यक्षमता तपासण्यात आली. धरणाच्या दीर्घकालीन सुरक्षिततेच्या दृष्टीने ही चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

पुणे येथून आलेल्या तज्ज्ञ पथकात वैज्ञानिक रोलँड अँड्रेड, अमोल चुनाडे आणि पूजा तिवारी यांचा समावेश होता. यावेळी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पारकर, शाखा अभियंता समीर निरुखे तसेच कनिष्ठ अभियंता वीरेंद्र मंडलिक यांनी पाहणी व तपासणी प्रक्रियेत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT