Cancer Patient In India Pudhari
कोल्हापूर

Maharashtra Cancer Cases: चिंताजनक! महाराष्ट्रात एका वर्षात १.३० लाख नवे कॅन्सर रुग्ण; रुग्णसंख्येत दुसऱ्या स्थानी- ICMR

Cancer cases maharashtra- कर्करोगाचे प्रमाण भारतामध्ये तीन दशकांत २६.४ टक्क्यांनी वाढले; रुग्णसंख्येत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Cancer Rate

कोल्हापूर : आशिष शिंदे

दिवसागणिक कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रातही कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनले आहे. केंद्र सरकारने आयसीएमआख्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये महाराष्ट्रात १ लाख ३० हजार ४६५ नवीन कर्करोग रुग्ण होते. हा आयसीएमआर एनसीडीआयआरचा अंदाज असून, २०२४ मध्ये १ लाख २७ हजार ५१२ कॅन्सर रुग्णांचा अंदाज होता. त्यामुळे वर्षभरात नवीन रुग्णसंख्येत २,९५३ ने वाढ झाली आहे.

देशातील राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्राचा क्रमांक उत्तर प्रदेशनंतर दूसरा आहे. कर्करोगाचे प्रमाण भारतामध्ये गेल्या तीन दशकांत (१२२० ते २०२३) २६.४ टक्क्यांनी वाढले आहे. अहवालानुसार, देशपातळीवरही २०२४ मधील १५ लाख ३३ हजार ५५५ वरून २०२५ मध्ये १५ लाख ६९ हजार ७९३ नवीन कर्करोग रुग्ण वाढल्याचा सरकारी अंदाज आहे.

कर्करोगाचा धोका वाढवणारे घटक

तंबाखूचे सेवन, अस्वास्थ्यकर आहार आणि मद्यपान यांसह काही चयापचयाशी संबंधित जोखमीचे घटक कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाशी संबंधित असल्याचे केंद्र सरकारने नमूद केले आहे. लोकसंख्या वाढणे आणि वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण वाढणे यांचाही कर्करोगाच्या वाढत्या ओड्यावर परिणाम होत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. आयसीएमआर एनसीडीआयआरच्या महाराष्ट्र कॅन्सर प्रोफाईलनुसार, नवीन कर्करोग रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या संख्येतील नवीन रुग्णांचा अंदाज राज्यातील कर्करोगाचा वाढता धोका अधोरेखित करतो.

Cancer Patient In India

२२ सप्टेंबरला साजरा केला जाणारा 'रोझ डे' हा कर्करोगग्रस्त रुग्णांना आधार, धैर्य आणि सकारात्मकतेचा संदेश देण्यासाठी समर्पित दिवस आहे. या दिवशी कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांना मानसिक आधार देणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्यासोबत आपण आहोत, हा विश्वास निर्माण करण्यावर भर दिला जातो. उपचारांसोबतच रुग्णांचे मानसिक आणि भावनिक आरोग्यही महत्त्वाचे असल्याने कुटुंबीय, मित्र आणि समाजाने त्यांना प्रेम, सहकार्य आणि प्रोत्साहन देण्याचा संदेश या दिवसातून दिला जातो.

तीन दशकांत २६.४ टक्के वाढ

गेल्या तीन दशकांत भारतातील कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. दर एक लाख लोकांमागे कर्करोगाचे प्रमाण १९२० मध्ये ८४.८ होते, ते २०२३ मध्ये १०७.२ वर पोहोचले, म्हणजेच या कालावधीत सुमारे २६.४ टक्क्यांनी वाढ झाली. हा भारताचा आकडा जीबीड़ी रिझल्ट टूलमधून मिळालेला अंदाज असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. जीबीडी रिझल्ट्स टूल टूलमधून मिळालेला अंदाज असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

जीबीडी रिझल्ट्स टूल हे जगभरातील गेल्या तीन दशकांत भारतातील कर्करोगाचे दर एक लाख लोकांमागे 50 कर्करोगाचे प्रमाण विविध आजार, मृत्यू आणि आरोग्यावरील परिणामांची आकडेवारी पाहण्यासाठी वापरले जाणारे ऑनलाईन साधन आहे. विविध देशांतील आजारांचे प्रमाण आणि त्यातील बदलांचा अंदाज या माध्यमातून मिळतो. उपचारांसोबतच रुग्णांचे मानसिक आणि भावनिक आरोग्यही महत्त्वाचे असल्याने कुटुंबीय, मित्र आणि समाजाने त्यांना प्रेम, सहकार्य आणि प्रोत्साहन देण्याचा संदेश या दिवसातून दिला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT