आमदार संजय गायकवाड  Pudhari File Photo
कोल्हापूर

Sanjay Gaikwad : आ. गायकवाड यांच्या बुलडाण्यातील घरावर आज महामोर्चा

कोल्हापुरातील 500 कार्यकर्ते रवाना

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‌‘शिवाजी कोण होता?‌’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आ. संजय गायकवाड यांनी फोनवरून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी (दि. 28) बुलडाण्यातील त्यांच्या घरावर पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते महामोर्चा काढणार आहेत. यासाठी कोल्हापुरातून भाकप व इतर पक्षांचे सुमारे 500 हून अधिक कार्यकर्ते बुलडाण्यास रवाना झाले आहेत.

आ. गायकवाड यांनी आंबी यांना फोनवरून धमकी दिली. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. पुरोगामी चळवळीने त्यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी त्यांची फसवणूक केली. याचा निषेध करण्यात आला. सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी चौक येथून शिवरायांना अभिवादन करून शेकडो कार्यकर्ते बुलडाण्यास रवाना झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT