विमानतळ संचालकपदी माधवराव सोनकुसले 
कोल्हापूर

Kolhapur News : विमानतळ संचालकपदी माधवराव सोनकुसले

अनिल शिंदे यांची जामनगरला बदली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरचे विमानतळ संचालक म्हणून माधवराव सोनकुसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान संचालक अनिल शिंदे यांची जामनगर (गुजरात) येथे विमानतळ संचालकपदावर बदली झाली आहे.

शिंदे यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये कोल्हापूर विमानतळाचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला होता. चार वर्षांच्या काळात त्यांनी कोल्हापूर विमानतळाच्या विकासाच्या प्रकल्पाला गती दिली. नाईट लँडिंग सुविधा, डीव्हीओआर प्रणाली, विस्तारीकरण, उजळाईवाडी-नेर्ली तामगाव रस्ता आणि कोल्हापूर-हुपरी मार्गावर वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत योगदान दिले. कोल्हापूर विमानतळावरून कनेक्टिव्हिटी वाढवणे, विमानतळाची नवी टर्मिनल इमारत उभारणी आणि त्याचा प्रत्यक्ष वापर यासाठीही त्यांचे योगदान राहिले.

कोल्हापूरचे महत्त्व आणि संधी याचा विचार करता हे विमानतळ अधिक वेगाने विकसित करण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य राहील. प्रलंबित विकासकामांना कालबद्ध नियोजनाद्वारे गती दिली जाईल. कोल्हापूर-शिर्डी, तिरुपती, नवी दिल्ली आदींसह विविध घटकांकडून होणार्‍या मागणीनुसार अन्य मार्गावर नव्या सेवा सुरू करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे नूतन संचालक सोनकुसले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT