सांगली : विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना निवेदन देताना मदनी ट्रस्टचे पदाधिकारी. Pudhari Photo
कोल्हापूर

Vishalgad Encroachment : विशाळगडावरील हल्ल्याप्रकरणी कारवाई करा

मदनी ट्रस्टची मागणी; विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

विशाळगड येथील दगडफेक करून समाजविघातक कृत्य करणार्‍यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे करण्यात आली. कोल्हापूर येथील त्यांच्या कार्यालयात याबाबत बैठक घेण्यात आली.

याबाबत फुलारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विशाळगडावरच्या अतिक्रमणाबाबत आंदोलन सुरू असताना काही समाजकंटकांनी गडावरील निरपराध मुस्लिम बांधवांना लक्ष्य करीत दगडफेक केली. तलवारीच्या धाकाने दमदाटी करत त्यांना मारहाण केली. यात लहान-थोर मंडळी जखमी झाली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी.

कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, सुफियांन पठाण, इमरान बेग, मौलाना साहिल देशनुर, सिकंदर जमादार, काशिम मुलानी, हाफिजी असलम मुजावर (कागल), हाफिज मकतुम (हातकणंगले), अखलाक मुंशी (कोल्हापूर) आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT