African Grey Parrot | ‘रिओ’ इज बॅक होम!हरवलेल्या पाळीव आफ्रिकन ग्रे पॅरेटसाठी शोध मोहीम फत्ते 
कोल्हापूर

African Grey Parrot | ‘रिओ’ इज बॅक होम!हरवलेल्या पाळीव आफ्रिकन ग्रे पॅरेटसाठी शोध मोहीम फत्ते

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

‘वेलकम टू होम रिओ’ असे पोस्टर बुधवारी रात्री सोशल मीडियावर झळकले आणि गेल्या चार दिवसांपासून हुरहुर वाटणाऱ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले. ‘घर सुटलं की दिशा हरवतात’ असं म्हणतात' पण जर मनात आपुलकी आणि शोधण्यात जिद्द असेल, तर हरवलेली पाखरंही पुन्हा घरटी परततात. कोल्हापूरच्या नागाळा पार्क परिसरातील केविझ पार्क येथे ३१ मे रोजी अखेरचा दिसलेला ‘रिओ’ नावाचा आफ्रिकन ग्रे पॅरट (राखाडी पोपट) अखेर ४ दिवसांच्या विरहानंतर आपल्या कुटुंबात सुखरूप परतला. निमित्त ठरलं ते अकबर मोहल्ला येथील एका सुजाण नागरिकाची सतर्कता आणि प्राणिमात्रांबद्दलची माया!

माणसाच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणारा, हा अत्यंत बुद्धिमान अेसा हा रिओ ३१ मे रोजी त्याच्या मालकाच्या घरातून उडून गेला. त्याचा संदर्भ देत सोशल मीडियावर त्याला शोधून देणाऱ्याला पाच हजारांचे बक्षीसही जाहीर केले; पण रिओचा कुठेच सुगावा लागत नव्हता. अशातच अकबर मोहल्ला येथे राहणाऱ्या जाफर शिंदी यांना हा अनोखा राखाडी रंगाचा आणि लाल शेपटीचा पक्षी दिसला. त्यांनी त्याबाबतची माहिती रिओच्या मालकाला दिली आणि काही वेळातच ‘रिओ इज बॅक’ असे सांगत त्याला शोधण्यासाठी चार दिवस प्रयत्न करणाऱ्या सर्वांच्या आभाराची पोस्ट झळकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT