मंत्री हसन मुश्रीफ (File photo)
कोल्हापूर

Minister Hasan Mushrif | पर्यटन व्यवसायासाठी महिलांना 15 लाखांपर्यंत देणार कर्ज

जिल्हा बँकेचे अध्यक्ष, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पर्यटन व्यवसायासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक महिलांना 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. शासनाचे आई पर्यटन धोरण बँकेकडून संपूर्ण जिल्ह्यात राबविले जाणार आहे. यासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कर्जावरील व्याज परतावाही बँक नियमाप्रमाणे पर्यटन संचालनालयाकडून दिला जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला ही कोल्हापूर जिल्ह्यतील असणे आवश्यक आहे. लाभार्थींचे बँक खाते आधार लिंक असावे. संबंधित पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा. व्यवसायात 50 टक्के व्यवस्थापकीय मालकी व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. महिला अर्जदारांनी विहित नमुन्यात ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज करावा. त्यांना पर्यटन संचालनालयाकडून पात्रता प्रमाणपत्र दिले जाईल. त्या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे.

शासनाच्या धोरणामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढेल आणि त्यांचा आर्थिक विकासचा स्तरही उंचावण्यास मदत होईल. धोरणाच्या माध्यमातून जिल्हा बँक महिलांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी व जुना व्यवसाय वाढविण्यासाठी प्राधान्याने मदत करणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. योजनेंतर्गत टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स, साहसी पर्यटन, पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन, होम स्टे, रिसॉर्ट, मोटेल, रेस्टॉरंट, टेंट, ट्री हाऊस, पर्यटन व्हिला, वूडन कॉटेजेस, बेकरी अशा पर्यटनाशी निगडित विविध व्यवसायांसाठी अर्थसाहाय्य करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT