Four Year Old Girl Assault Case | चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधमास मरेपर्यंत जन्मठेप 
कोल्हापूर

Four Year Old Girl Assault Case | चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधमास मरेपर्यंत जन्मठेप

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : चॉकलेटच्या अमिषाने चार वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. करण रुपसिंग कुवर (वय २५, मूळ रा. इकाजको पोस्ट ढोकमोका, जि. करबी आसाम, सध्या रा. सांगवडे, ता. करवीर) असे आरोपीचे नाव आहे. गोकुळ शिरगाव पोलिसांनी चार महिन्यांत या घटनेचा तपास करून जलदगती न्यायालयात खटला चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला.

आरोपी करण कुवर व पीडितेचे कुटुंब सांगवडे येथील एका मिलमध्ये राहण्यास होते. ओळखीचा फायदा घेऊन २८ जून २०२६ ला दुपारी १ वाजता करणने चार वर्षांच्या चिमुरडीस चॉकलेटच्या अमिषाने कंपनीच्या कोपऱ्यात असलेल्या झाडीत नेऊन अत्याचार केला. या घटनेमुळे भेदरलेल्या चिमुरडीने घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर तिच्या आईने ११२ हेल्पलाईन नंबरला फोन करून घटनेची माहिती दिली. याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नीलोत्पल, पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

संशयित करण कंपनीच्या एका खोलीत लपून बसला होता. त्याला तत्काळ अटक करून गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल केला. एक महिन्यात त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालविला. सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी १९ साक्षीदार तपासले, सीपीआर रुग्णालयात उपचार करणारे ४ डॉक्टर, फॉरेन्सिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज तसेच सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष पोक्सो न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी करण कुवर याला दोषी ठरवत मरेपर्यंत सक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT