आरळे-शहापूर रस्त्यावर बिबट्या व त्याची दोन पिल्ले रस्ता ओलांडताना.  
कोल्हापूर

Leopard Sighting | आरळे-शहापूर रोडवर बिबट्याचा वावर; दोन पिल्लांसह दर्शनाने ग्रामस्थांत भीती

पुढारी वृत्तसेवा

मोहरे : आरळे- शहापूर ओढ्याच्या कॉर्नर रोडलगत तसेच सौरव पौंडकर यांच्या शेड परिसरात सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मादी बिबट्या दोन पिल्लांसह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कॉलेजवरून परतणारे आरळे (ता. पन्हाळा) येथील केदार पायमल, पवन उजगावकर आणि सुमित शिंदे हे तरुण आरळे- शहापूर रस्त्याने जात असताना त्यांना मादी बिबट्या व तिची दोन पिल्ले प्रत्यक्ष दिसली. केदार पायमल यांनी प्रसंगावधान राखत बिबट्या व पिल्लांच्या हालचाली मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्या. बिबट्या रस्ता ओलांडून परिसरातील शेताकडे जात असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी शेतात एकट्याने न जाता समूहाने जावे, तसेच अंधाराच्या वेळी या मार्गावरून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT