सोनारवाडी : पाटणे वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांनी लावलेला दुसरा सापळा. 
कोल्हापूर

Leopard Sighting | बिबट्या आला कुठून? बारा गावांच्या वेशीत वावर

पुढारी वृत्तसेवा

चंदगड : गंधर्वगड परिसरात मागील तीन महिन्यांपासून वास्तव्य असणारा बिबट्या आला कुठून, असा प्रश्न आता वन विभागासह गंधर्वगड परिसरातील बारा गावांतील लोकांना पडला आहे. मागील सहा दिवसांपासून माणगाववाडी-सोनारवाडी जवळ त्याच्या वावर मार्गावर दोन सापळे लावण्यात आले आहेत, तरीही या बिबट्याने अद्याप गुंगाराच दिला आहे. मागील आठ दिवसांपासून माणगाववाडी, हुंबरवाडी, मलतवाडी, लकीकट्टे, म्हाळेवाडी, घुल्लेवाडी, पोरेवाडी, वाळकुळी, केरवडे, गंधर्वगड, आसगोळी या गावांच्या वेशीपर्यंत या बिबट्याचा वावर होत आहे.

या बिबट्याची आता खाद्य म्हणून गावात असणार्‍या पाळीव कुत्र्यांवर नजर आहे. त्यामुळे या बिबट्याचा दहा ते बारा गावांच्या वेशीवर वावर होत आहे. त्यामुळे आता लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. गंधर्वगडपासून अडकूरच्या पुढील पट्ट्यात आजरा तालुक्याचे घनदाट वन क्षेत्र लागून आहे. या ठिकाणाहून सदर बिबट्या भटकंती करत गंधर्वगड परिसरातील जंगलात आला असावा, अशी शक्यता वनपाल जॉन्सन डिसोजा व पाटणे वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांनी वर्तवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT