राई : मादी बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात बिबट्याच्या पिल्लाला सोडताना वनविभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीम. Pudhari Photo
कोल्हापूर

...अन बिबट्याच्या पिल्लाला आई जवळ पोहचविण्यात वनविभागाच्या रेस्क्यू टीमला यश!

पिल्लू नेतानाचे फुटेज ट्रॅप कॅमेरात बंदिस्त

पुढारी वृत्तसेवा

गुडाळ : राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्प परिसरात बुधवारी सायंकाळी सापडलेले बिबट्याचे पिल्लू बुधवारी रात्री उशिरा मादीचा वावर असलेल्या ठिकाणी ठेवले होते. पहाटे ते पिल्लू मादीने नेल्याचे वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात स्पष्ट झाले.

बुधवारी सायंकाळी रेस्क्यू टीमने ज्या दिशेने पिल्लू पुनर्वसित बांधकाम ठिकाणी आले होते. त्या दिशेला ड्रोन कॅमेऱ्याद्वारे मादी बिबट्याचा शोध घेतला. तेव्हा पिल्लू सापडल्यापासून अंदाजे दोन किलोमीटरवर असलेल्या लक्ष्मीचे पाणी परिसरात बिबट्याची मादी आढळून आली. वनरक्षक अशोक संकपाळ यांनी रेस्क्यू टीमच्या सहकार्याने बुधवारी रात्री मादीचा वावर असलेल्या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर पिल्लाला ठेवले होते. रात्री उशिरा मादी पिलाला घेऊन गेल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झाले.

बछडा दुरावल्याने अस्वस्थ असलेल्या बिबट्या मादीचा वावर या परिसरात धोकादायक ठरला असता. मात्र, गुरुवारी सकाळी ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बछडा आणि मादीची भेट झालेली घटना स्पष्ट झाल्यानंतर वनविभाग, रेस्क्यू टीम आणि परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT