बर्की : येथे सायंकाळी मोबाईलमध्ये टिपलेलले बिबट्याचे छायाचित्र 
कोल्हापूर

Barki Leopard Attack | बर्की येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

पुढारी वृत्तसेवा

करंजफेण : बर्की (ता. शाहूवाडी) परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या संजय कोटकर (वय ४५) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काल रात्री कांटे येथेही बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर सायंकाळी ६.३० च्या सुमारास कोटकरवाडीजवळ विठोबा बुराण यांना बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये अधिकच घबराट निर्माण झाली आहे. बिबट्याचा वावर वाढल्यामुळे बर्की परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. शेतकरी तसेच पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्रीच्या वेळी शेतात जाणे आणि गुरेढोरे सांभाळणे धोकादायक ठरत आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने परिसरात बिबट्याचा माग काढण्यास सुरुवात केली असून, त्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी बिबट्या दिसल्यास त्याच्याजवळ जाण्याचा अथवा त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नये. तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन परिमंडळ वन अधिकारी किशोर आहेर यांनी केले आहे. दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT