कोल्हापूर

रॉयल स्टॅग बूमबॉक्सच्या वतीने ‘पहले जैसी बात नहीं’ गाणे लाँच

Arun Patil

कोल्हापूर : रॉयल स्टॅग बूमबॉक्सच्या वतीने 'पहले जैसी बात नहीं' गाणे लाँच झाले आहे. व्हायकॉम 18 च्या सोबत सादर केलेला हा एक अद्वितीय संगीतमय अनुभव आहे. यामध्ये बॉलीवूडची मेलडी आणि मुंबईचे प्रसिद्ध गल्ली हिपहॉप यांचा अनोखा संगम आहे.

हा एक नवीनच संगीतमय अनुभव असेल. पूर्वांपार संगीत श्रोत्यांमध्ये हे गाणे अद्भुत भावना जागरूक करते. त्यामुळेच संगीत हे सीग्रामच्या रॉयल स्टॅगसाठी महत्त्वाचा आधारस्तंभ बनले आहे. रॉयल स्टॅग बूमबॉक्स 4 ओरिजिनल म्युझिक व्हिडीओच्या लाँचसह पुढील टप्प्यात प्रवेश करत आहे. गायिका जसलीन रॉयल आणि रॅपर डिनो जेम्स यांच्या संयोजनाचा समावेश आहे. या गाण्यात बॉलीवूडचा उत्साह आणि हिपहॉपच्या ताल धरायला लावणार्‍या बीटस्चा समावेश आहे. हे गाणे आजच्या तरुणांचे लक्ष वेधून घेते.

रॉयल स्टॅग बूमबॉक्सच्या अद्वितीय डिजिटल फॉर्मेटचा भाग म्हणून व्यासपीठांवर रीलिज करण्यात येणार्‍या चार ओरिजिनल मेलडी व हिपहॉपचे संयोजन असलेल्या गाण्यांपैकी हे पहिले गाणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT