Dr. D.Y. Patil  
कोल्हापूर

Dr. D. Y. Patil : ...अन्‌ दोन गुणांनी डी. वाय. पाटील यांची ऑलिम्पिकची संधी हुकली

मुलाखतींमध्ये सांगितली कुस्तीची आठवण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ऐतिहासिक खासबाग मैदानात डॉ. डी. वाय. पाटील आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते खाशाबा जाधव यांच्यात कुस्ती झाली. यात खाशाबा यांना बारा गुण, तर डी. वाय. पाटील यांना दहा गुण मिळाले. केवळ दोन गुणांनी ऑलिम्पिकला जाण्याची संधी हुकल्याची आठवण दस्तुरखद्द डी. वाय. पाटील यांनी विविध ठिकाणी बोलून दाखविली आहे.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी तरुणपणी कुस्ती खेळल्याचे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. कोल्हापूरच्या ऐतिहासिक खासबाग मैदानात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते खाशाबा दादासाहेब जाधव यांच्याशी कुस्ती खेळल्याची आठवण त्यांनी अनेकदा सांगितली होती. त्यांचे वजन १०८ पौंड, तर माझे ९८ पौंड होते. आपण खाशाबा यांच्यापेक्षा सात-आठ वर्षाने लहान होतो. वजनाने जास्त असल्याने त्यांच्याशी झालेली कुस्ती जिंकू शकलो नाही.

या लढतीत खाशाबा जाधव यांनी वेगवान डावपेच, चपळाई आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर विजय मिळवला, अशी नोंद त्यांच्या विविध आठवणींमध्ये आढळते. स्वतः डॉ. डी. वाय. पाटील यांनीही अनेक प्रसंगी सांगितले होते की, खाशाबा जाधव यांच्यासारख्या महान कुस्तीपटूशी सामना करण्याची संधी मिळणे हेच त्यांच्यासाठी अभिमानाची बाब होती. या अनुभवातून शिस्त, जिद्द आणि खेळाडूवृत्तीचे महत्त्व शिकल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT