राशिवडे : येथील जमीन वहिवाटीचा वाद न्यायालयात असल्याने शेतातील गवत कापू नका, वाद चर्चेने मिटवू, असे सांगत असताना झालेल्या वादातून दोन सख्या चुलत भावांच्या गटांत हाणामारी होऊन नऊजण जखमी झाले. याबाबत आठजणांविरुद्ध राधानगरी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, गट नं. 364 मधील जमीन वहिवाटीचा वाद जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आहे. हा वाद चर्चेने मिटवू, असे सांगण्यासाठी गेले असता संदीप कृष्णात व्हनाळकर, रवींद्र पांडुरंग व्हनाळकर, संतोष महादेव व्हनाळकर, विनायक कृष्णात व्हनाळकर, सागर महादेव व्हनाळकर, महादेव केरबा व्हनाळकर, पांडुरंग केरबा व्हनाळकर, धनाजी पांडुरंग व्हनाळकर या आठजणांनी किरण एकनाथ व्हनाळकर, संदीप लक्ष्मण व्हनाळकर, सौ. माया संदीप व्हनाळकर, एकनाथ विष्णू व्हनाळकर, लक्ष्मण विष्णू व्हनाळकर, हौसाबाई लक्ष्मण व्हनाळकर, साताप्पा रघुनाथ व्हनाळकर, नेताजी सदाशिव व्हनाळकर, रामचंद्र रघुनाथ व्हनाळकर या नऊजणांना काठी, फरशीने मारहाण केल्याची तक्रार किरण व्हनाळकर यांनी पोलिस ठाण्यामध्ये दिली आहे.
जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक तपास राधानगरीचे पो. नि. संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. शेळके व तारडे करत आहेत.