कोल्हापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई- केवायसी अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी सध्या महिलांनी अक्षरशः पायाला भिंगरी बांधल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. राज्यभरात सुमारे 68 लाख महिलांच्या केवायसी फॉर्ममध्ये चुका आढळल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत दिली आहे.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्यभर सुमारे 68 लाख महिलांच्या केवायसी अर्जांमध्ये त्रुटी
कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 10 लाख महिलांच योजनेसाठी अर्ज
मुदतीत दुरुस्ती न केल्यास हप्ता बंद करण्याबाबत शासनाचा निर्णय शक्य
केवायसी अर्जात त्रुटी आढळलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 99 हजार महिलांची सध्या चूक दुरुस्तीसाठी धावपळ सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे 10 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. राज्य सरकारने यापूर्वी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्या मुदतीत अनेक महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली; मात्र अर्ज भरताना काही गुंतागुंतीच्या प्रश्नांमुळे तसेच तांत्रिक अडचणींमुळे चुकीची माहिती भरली गेली. अशा महिलांना 31 एप्रिल पर्यंत केवायसी अर्जातील चुका दुरुस्ती करण्यासाठी मुदत दिली आहे. ज्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी केली नाही, त्यांच्या अर्जांबाबत राज्य शासन स्वतंत्र निर्णय घेणार आहे. त्यामुळे अशा महिलांमध्येही अस्वस्थता वाढली आहे.
मुदतीत केवायसी करून त्यातील त्रुटी 30 एप्रिलपर्यंत दुरुस्त करणार्या महिलांचा आर्थिक हप्ता सुरू राहील; मात्र ज्यांनी केवायसी केली नव्हती. त्यांच्या बाबतीत राज्य सरकारच्या निर्णयानंतरच पुढील कार्यवाही होईल.सुहास वाईंगडे