Koyna Express cancelled | कोयना एक्स्प्रेस उद्या रद्द; ‘वंदे भारत’ साताऱ्यातून सुटणार  
कोल्हापूर

Koyna Express cancelled | कोयना एक्स्प्रेस उद्या रद्द; ‘वंदे भारत’ साताऱ्यातून सुटणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुणे आणि हडपसर यार्डमध्ये हडपसर-घोरपडी तिसऱ्या मार्गाच्या प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे केली जाणार आहेत. याकरिता ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे कोल्हापुरातून सुटणाऱ्या काही रेल्वे गाड्यांच्या सेवांवर परिणाम झाला आहे.

रविवार (दि. ४) रोजी कोल्हापूर-मुंबई आणि मुंबई-कोल्हापूर या दोन्ही कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहेत. पुणे-कोल्हापूर ही वंदे भारत पुण्याऐवजी साताऱ्यातून सुटणार आहे. रविवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी कोल्हापुरातून सुटणारी कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस जेजुरीपर्यंतच धावणार आहे. तसेच, पुण्यातून सकाळी दहा वाजून ५० मिनिटांनी सुटणारी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस जेजुरीतून सुटणार आहे.

यासह पुणे-मिरज, पुणे-सोलापूर मार्गावरील रेल्वेसेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. या मार्गावरील काही गाड्या रद्द केल्या आहेत, काही गाड्यांचा मार्ग बदलला आहे, तर काही गाड्यांच्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या ठिकाणांत बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांच्या गाडीची सद्यस्थिती आणि सुधारित वेळापत्रकाची अचूक माहिती भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर तपासावी. सुधारीत वेळापत्रकानुसारच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT