कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात बुधवारी गारठा कायम होता. सलग तिसर्या दिवशी पारा 14 अंशांवर राहिल्याने थंडीचा कडाका आजही जाणवत होता. गुरुवारपासून तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्हा थंडीने गारठला आहे. तीन दिवसांपासून तर तापमानात कमालीची घट झाली आहे. रविवारी 15 अंशांखाली आलेला पारा अद्याप वाढलेला नाही. यामुळे सकाळी आणि सायंकाळनंतर थंडीची हुडहुडी अधिक जाणवत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक आहे. चंदगड, आजरा, पन्हाळा, राधानगरी आदी तालुक्यांतील काही परिसरात पारा 12 अंशांखाली जात आहे. थंडी कायम असल्याने सर्दी-खोकल्यासह तापाच्या रुग्णांतही वाढ होत आहे. बुधवारी शहरात
मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणार्यांच्या संख्येवरही काहीसा परिणाम झाला आहे. बहुतांश सर्व जण उबदार कपड्यांनी पूर्ण ‘पॅक’ होऊनच घराबाहेर पडत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. वाढत्या थंडीने स्वेटर, कानटोपी, हातमोजे आदी उबदार कपड्यांसह थंडीपासून संरक्षण करणार्या सौंदर्य प्रसाधनानाही मागणी वाढत आहे. दरम्यान, बुधवारी शहरात सरासरी तापमानात 0.5 अंशांनी घट झाली. आज 14.8 अंश इतक्या किमान, तर 29.1 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात काहीशी वाढ झाल्याने दुपारी काही काळ उन्हाची तीव—ताही जाणवत होती.