Kolhapur ZP: जि.प. अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत, भाजपचे तानाजी पाटील उपाध्यक्ष Pudhari
कोल्हापूर

Kolhapur ZP: जि.प. अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत, भाजपचे तानाजी पाटील उपाध्यक्ष

काँग्रेसची निवडणुकीतून माघार; बिनविरोध निवडी : एकोप्याने काम करण्याचे महायुतीचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अखेर राष्ट्रवादी काँग््रेासच्या शिल्पा शशिकांत खोत (सेनापती कापशी) यांची, तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील (गडमुडशिंगी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात मंगळवारी दुपारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमोल येडगे होते, तर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. हे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेसाठी 7 फेबुवारीला मतदान, तर 9 फेबुवारीला निकाल जाहीर झाला. स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता येणार, हे स्पष्ट होते. परंत अध्यक्षपद महायुतीमधील कोणत्या पक्षाला मिळणार यावरून मतभेद दिसून आले. महिनाभर हा गुंता सुटला नव्हता. यासंदर्भात मुंबई येथे महायुतीच्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नसल्याने अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविला होता. रविवारी मुख्यमंत्री फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता विमानतळावर झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग््रेासला देण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये हालचाली गतिमान झाल्या.

बिनविरोधसाठी हालचाली सुरू

राष्ट्रवादी काँग््रेासचे गटनेते सुधीर देसाई, मनोज फराकटे, अमरिश घाटगे, अर्जुन आबिटकर आदींनी काँग््रेासचे गटनेते एकनाथ पाटील, रसिका पाटील, संभाजी पाटणकर यांना बिनविरोध करा, अशी विनंती केली. तशी प्राथमिक चर्चा करण्यात आली. परंतु, काँग््रेासच्या सदस्यांनी नेते आ. सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय देतो, असे सांगितले.

काँग््रेासचे गटनेते एकनाथ पाटील, अभिजित तायशेटे, अध्यक्षपदाच्या उमेदवार रसिका पाटील, उपाध्यक्षपदाचे उमेदवार संभाजी पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. या प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी येडगे यांनी अध्यक्षपदी सौ. शिल्पा खोत यांची, तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या निवडीनंतर जिल्हाधिकारी येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून नूतन पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. काँग््रेासकडून विकासाचे काम करण्यासाठी उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर करत सत्ताधाऱ्यांनीही सहकार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी विरोधकांचे आभार मानत विकासासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, ‌‘गोकुळ‌’चे चेअरमन नाविद मुश्रीफ, अमरिश घाटगे, माजी आमदार राजेश पाटील, डॉ. नंदाताई बाभुळकर, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, राष्ट्रवादी काँग््रेासचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, जनसुराज्यचे समीत कदम यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT