Kolhapur ZP elections: ‘मैत्रीपूर्ण‌’च्या नावाखाली महायुतीमध्येच राजकीय ईर्ष्या Pudhari
कोल्हापूर

Kolhapur ZP elections: ‘मैत्रीपूर्ण‌’च्या नावाखाली महायुतीमध्येच राजकीय ईर्ष्या

जिल्हा परिषद गटांमध्ये बहुतांशी ठिकाणी तिरंगी-चौरंगी लढतींचे चित्र

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महायुतीत ‌‘मैत्रीपूर्ण‌’ या गोंडस नावाखाली सुरू असलेल्या राजकीय ईर्ष्येमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत बहुतांशी जिल्हा परिषद मतदारसंघांत तिरंगी किंवा चौरंगी लढतींचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांत महायुती एकत्र राहिली नाही. मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली महायुतीमधील घटक पक्षांचे उमेदवारच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन विरोधकांना त्याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिरंगी किंवा चौरंगी लढतींचे चित्र असले, तरी काही मतदारसंघांत थेट दुरंगी लढत पाहावयास मिळणार आहेत. मैत्रीपूर्ण लढती होत असल्यामुळे उमेदवारांना आता विरोधकांबरोबरच आपल्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांवरदेखील नजर ठेवावी लागणार असल्याने पारंपरिक प्रचाराऐवजी त्याची दिशा बदलावी लागणार आहे.

निवडणुकीचा दिवस जवळ येईल तशी राजकीय ईर्ष्या वाढणार असल्याने यावेळची जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. तिरंगी व चौरंगी लढतींमुळे मैत्रीपूर्ण राजकारणाचा खरा कस या निवडणुकीत लागणार असून, शेवटपर्यंत अंदाज बांधणे कठीण झाले आहे. करवीर तालुक्यात काँग््रेासला रोखण्यासाठी महायुतीने मात्र सहमतीने उमेदवार दिल्याचे दिसते. त्यामुळे शक्य त्या ठिकाणी काँग््रेासला एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे गोकुळ शिरगाव, कळंबा तर्फ ठाणे, मुडशिंगी येथे भाजप विरुद्ध काँग््रेास अशी दुरंगी लढत होत असून, अन्य ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र आहे.

शिरोळ तालुक्यात तिरंगी लढतीचे चित्र, तर हातकणंगले तालुक्यात काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. हातकणंगले तालुक्यात कुंभोज, रेंदाळ, रुकडी, भादोले, शिरोली, रुई या गटांतील लढती लक्षवेधी असणार आहेत. चंदगड तालुक्यात तिरंगी लढत दिसत असली, तर मुख्य लढत महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेास यांच्यातच आहे. आजरा तालुक्यातही महायुतीमध्येच सामना रंगणार असून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि ताराराणी आघाडी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषदेमध्ये गारगोटीमध्ये आघाडी विरुद्ध शिवसेना असा थेट सामना असून, अन्य ठिकाणी तिरंगी लढत आहे. गडहिंग्लजमध्ये भडगाव येथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. अन्य गटांमध्ये तिरंगी, बहुरंगी लढती पाहावयास मिळणार आहेत. शाहूवाडीत बांबवडे व शित्तूर वारुण यांच्यामध्ये जनसुराज्य शक्ती व ठाकरे शिवसेना यांच्यात थेट लढत होत आहे. अन्य ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. गगनबावडा तालुक्यात एका गटात काँग््रेास विरुद्ध शिवसेना, तर दुसऱ्या गटात काँग््रेास विरुद्ध भाजप असा थेट सामना होणार आहे.

राधानगरीत तालुक्यात सर्वत्र बहुरंगी लढती आहेत. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग््रेास या सर्वांनीच आपापले उमेदवार जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. पन्हाळा तालुक्यातही बहुरंगी लढतीचे चित्र पाहावयास मिळते. सातवे मतदारसंघात जनसुराज्य शक्ती व भाजप, पोर्ले तर्फ ठाणे मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध जनसुराज्य शक्ती, तर यवलूजमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे उमेदवार उभे आहेत.

या लढतींकडे लक्ष

गोकुळ शिरगाव, कळंबा तर्फ ठाणे व मुडशिंगी गटात होत असलेल्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या लढती काँग््रेास व भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.

कागल तालुक्यात थेट दुरंगी लढत

कागल तालुक्यातील चार प्रमुख गटांपैकी मुश्रीफ व दोन्ही घाटगे एकत्र आले असून, त्यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक लढत आहेत. त्यामुळे या तालुक्यात दुरंगी लढती होत असून सिद्धनेर्ली, बोरवडे येथील लढती लक्षवेधी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT