वयोवृद्ध महिला मतदार यशोदा दत्तू घोळसे  
कोल्हापूर

Kolhapur ZP Election | 90 वर्षाच्या आजी चालत मतदानासाठी आल्या, मात्र मतदान केंद्रात पोहचताच आला हृदयविकाराचा धक्का...

वयोवृद्ध महिला मतदाराचा जागेवरच मृत्‍यू, चंदगड तालुक्यातील मलगड येथील घटना, मतदान केंद्रात शोकाकुल वातावरण

पुढारी वृत्तसेवा

चंदगड : मतदान केंद्रातच वृद्ध महिला मतदाराचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना चंदगड तालुक्यातील मलगड येथे शनिवारी (दि. 7) सकाळी 11 वाजता घडली. माणगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या मलगड गावात मतदान केंद्र क्रमांक 19 मध्ये सदर घटना घडली. यशोदा दत्तू घोळसे ( वय 90, रा. मलगड, ता. चंदगड) असे मृत झालेल्या वयोवृद्ध महिला मतदाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यशोदा या सकाळी १०.४५ वाजता गावातील प्राथमिक शाळेमधील मतदान केंद्राकडे गेल्या होत्या. यावेळी त्या स्वतः पायऱ्या चढून शाळेतील मतदान केंद्रात प्रवेश केला, मात्र मतदान केंद्रामध्ये पोहोचताच त्याना चक्कर आली आणि त्या खाली पडल्या. या दरम्यान त्याना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. लागलीच त्यांना माणगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांचे आधीच निधन झाल्याची माहिती दिली. या घटनेमुळे मतदान केंद्रात शोकाकुल वातावरण झाले होते. सुंडी (ता. चंदगड) येथील हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक एस. डी. घोळसे व गावातील ब्रह्मलिंग सहकारी दूध संस्थेचे सचिव नरसिंग घोळसे यांच्या त्या मातोश्री होत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT