जिल्हा परिषदेकडून 29 जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur News| जिल्हा परिषदेकडून 29 जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

गणपती कुंभार यांना 2024-25 तर राजाराम र्‍हायकर यांना 2025-26 चा विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर ः येथील जिल्हा परिषदेतर्फे दिलेल्या जाणार्‍या आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या 27 आणि विशेष पुरस्कारप्राप्त दोनजणांची नावे गुरुवारी जाहीर करण्यात आली. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. गणपती कुंभार (अर्जुनवाडा, कागल) यांना 2024-25 तर राजाराम र्‍हायकर (खामकरवाडी, राधानगरी) यांना 2025-26 चा विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कारप्राप्त शिक्षक व शाळा (विद्यामंदिर) ः डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार 20024-25 श्रीमती अर्चना म्हांगारे (शेळप, आजरा), मारुती देवेकर (सोनाळी, भुदरगड), कीर्ती पाटील (तडसिनहाळ, चंदगड), वैशाली भोईटे (हसूरचंपू, गडहिंग्लज), छाया चौगुले (म्हाकवे, कागल), बंडोपंत पाटील (राधानगरी), राजमोहन पाटील (भादोले, हातकणंगले), आनंदा पाटील (बाचणी, करवीर), उर्मिला तेली (वेतवडे, पन्हाळा), भानुदास सुतार (परखंदळे, शाहूवाडी), महम्मदआसिफ मुजावर (घोसरवाड, शिरोळ), बाजीराव जाधव (तळये बु. गगनबावडा). सन 2025-26 साठी उमाताई लोणारकर (लिंगवाडी, आजरा), मारुती डवरी (सोनाळी, भुदरगड), संजय गुरव (बेगवडे, भुदरगड), रंजिता देसूरकर (माडवळे, चंदगड), क्रांतिसिंह सावंत (वेतवडे, गगनबावडा), मारुती गुरव (मांडुकली गाव गगनबावडा विभागून), सतीश पाटील (भैरेवाडी, कागल), साताप्पा शेरवाडे (कासारवाडा, राधानगरी), संतोष कोळी (संभाजीनगर सावर्डे, हातकणंगले), बाबूराव निकम (म्हालसवडे, करवीर), पल्लवी पाटील (तांदूळवाडी, पन्हाळा), ललिता माने (चौगलेवाडी, शाहूवाडी), अपर्णा परीट (टाकवडे, शिरोळ). निवड समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., प्राचार्य डॉ. एल. एस. पाटील, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, डॉ. रघुनाथ कडाकणे, मुख्याध्यापक बी. बी. पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT