Kolhapur ZP Election Result Live Pudhari photo
कोल्हापूर

Kolhapur ZP Election Result: कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीनं मारली बाजी; काँग्रेस दुसऱ्या स्थानी

Kolhapur Zilla Parishad Election Result: कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष तर काँग्रेसची धाव दुसऱ्या क्रमांकापर्यंत

Anirudha Sankpal

Kolhapur ZP Election Result:

कोल्हापूर जिल्ह्यातील ६८ जिल्हा परिषद जागांपैकी ६७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीने सर्वाधिक २० जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस १५ जागांसह दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.

भाजपला १२ जागा जिंकता आल्या असून शिवसेना शिंदे गटानं ९ जागा जिंकल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेला १ जागेवरच समाधान मानावं लागलं आहे. दुसरीकडं जनसुराज्यनं ५ जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीने मिळून ४१ जागा जिंकल्या आहेत.

Update : कोल्हापूर जिल्हा परिषद- 68/67

एकूण जागा - 68

आतापर्यंत 67 पक्षनिहाय विजयी झालेले उमेदवार.

भाजप - 12

शिवसेना (शिंदे) - 9

राष्ट्रवादी - 20

काँग्रेस - 15

शिवसेना (ठाकरे) - 1

जनसुराज्य - 5

स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1

शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4

इतर -

कळे निकाल बाकी

राधानगरी पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता 

राधानगरी पंचायत समिती निवडणुकीत ६ जागा जिंकून काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. शिवसेना शिंदे गट २ तर राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर जिंकली आहे.

राधानगरी जिल्हा परिषद मतदार संघात गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे हे २९९ मताने विजयी झाल्यामुळे पराभूत उमेदवार राजेंद्र पांडुरंग भाटळे यांनी फेर मतमोजणी मागितली आहे.

राष्ट्रवादीनं काँग्रेसला टाकलं मागं

मतमोजणीच्या सुरूवातींच्या कलामध्ये काँग्रेस पक्ष हा कोल्हापूर जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल असं वाटत होतं. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं काँग्रेसला मागं टाकलं आहे.

भाजप - १२

राष्ट्रवादी काँग्रेस अप - १८

काँग्रेस - १३

शिवसेना शिंदे गट - ७

शिवसेना उबाठा - १

इतर - १०

गोकुळच्या माजी अध्यक्षांना मोठा धक्का

गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटलांना मोठा धक्का बसला आहे. पाडळी खुर्द गटातून त्यांचा मुलगा सचिन पाटलांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राजेंद्र सूर्यवंशी यांनी त्यांचा पराभव केला आहे.

रशिवडेत गोकुळच्या माजी संचालकांचा मुलगा विजयी

राशिवडे जिल्हा परिषद मतदार संघात गोकुळचे माजी संचालक पी डी धुंदरे यांचा मुलगा सागर धुंदरे विजयी झाले आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सदस्य विनय राजेंद्र पाटील यांचा पराभव झाला.

यड्राव जिल्हा परिषद

यड्राव जिल्हा परिषद काँग्रेसच्या अर्चना चौगुले विजयी

धामोड पंचायत समिती

धामोड पंचायत समिती मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे केरबा पाटील

राशिवडे पंचायत समिती मतदारसंघात काँग्रेसच्या अमृता अतुल पाटील

पंचायत समिती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पुनम युवराज पाटील

कसबा तारळे पंचायत समिती मतदार संघात राष्ट्रवादीचे संग्राम अरुण कलिकते विजयी

पाचगाव जि. प. 

पाचगाव जिल्हा परिषद उमेदवार संग्राम पाटील हे तिसऱ्या फेरीअखेर ५६० मतांनी आघाडीवर

दतवाड जिल्हा परिषद

शिंदे शिवसेनेच्या उत्तरा विजितसिंह शिंदे 800 मतांनी विजयी.

आलास जिल्हा परिषद मतदारसंघ

भाजपचे प्रशांत शहापुरे जायंट किलर.. 1500 मतांनी विजयी

पिंपळगामधून पालकमंत्र्यांच्या भावजय विजयी

पिंपळगावमधून पालकमंत्री अबिटकर यांच्या भावजय रोहिणी अर्जुन अबिटकर या विजयी झाल्या आहेत.

अरूण डोंगळेंची कन्या विजयी

गोकुळचे माजी चेअरमन अरूण डोंगळेंची कन्या विजयी झाल्या आहेत. त्यांनी कसबा तारळेमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या.

कोल्हापूर ब्रेकिंग : संजय मंडलिक यांना धक्का

कागल मध्ये जिल्हा परिषदेच्या सहाही जागांवर मुश्रीफ आणि दोन्ही घाटगे गटाच्या उमेदवारांचा विजय, तसेच पंचायत समितीच्या 11 जागांवर विजय संजय मंडलिक यांच्या वाटेला केवळ 1 पंचायत समितीची जागा

कोल्हापूर जिल्हा परिषद - ६८

भाजप - ७

शिवसेना - ७

राष्ट्रवादी काँग्रेस (AP) - ११

काँग्रेस - १२

शिवसेना (उबाठा) - २

इतर - ५

शाहूवाडी जिल्हा परिषद

राष्ट्रवादी अजित पवार गाटच्या राजकुंवर गायकवाड विजयी

हातकणंगले जिल्हा परिषद

कुंभोज जी प मध्ये जनसुराज्य पक्षाच्या शितल प्रविण यादव विजयी

गडमुडशिंगी जिल्हा परिषद

मुडशिंगी जिल्हा परिषद भाजपचे तानाजी पाटील विजयी

राशिवडे जिल्हा परिषद

काँग्रेस सागर धुंदरे विजयी, पंचायत समिती कॉंग्रेच्या अमृता पाटील विजयी

उंचगाव जिल्हा परिषद

भाजपचे नामदेव वाईंगडे विजयी.

वडणगे जिल्हा परिषद शिवसेनेचे इंद्रजीत पाटील विजयी

वडणगे जि. प. इंद्रजीत पाटील शिवसेना सहाव्या फेरी अखेर २२७३ मतांनी विजयी

वडणगे प. स. बळीराम कळके सहाव्या ६०० मतांनी विजयी

खुपीरे प. स. आशा पाटील ६५८ मतांनी विजयी

कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी

काँग्रेसने आतापर्यंत 12 जागावर विजय

दुसऱ्या क्रमांकवर राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा मिळवल्या

भाजप 7, शिवसेना 6, जनसुराज्यने 4 जागा मिळवल्या

ठाकरे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रत्येकी एक जागा मिळवली

चंदगड -8

भाजप - 2 काँग्रेस - राष्ट्रवादी - 2 शिवसेना, जनसुराज्य - 1

गडहिंग्लज - 10 

भाजप - 2 काँग्रेस - राष्ट्रवादी - 4 शिवसेना

आजरा 4 शिवसेना भाजप आघाडीवर

भाजप - 1 काँग्रेस - राष्ट्रवादी, शिवसेना- 2

भुदरगड - 8 शिवसेना आघाडीवर

भाजप - काँग्रेस -2 राष्ट्रवादी शिवसेना- 4

कागल - 12 राष्ट्रवादी भाजप वाढून काँग्रेसचा अजूनही भोपळाच

भाजप - 2 काँग्रेस - राष्ट्रवादी - 5 शिवसेना- 1

राधानगरी 10 भाजप अजून खातंही नाही 

भाजप -

काँग्रेस -1

राष्ट्रवादी- 2

शिवसेना -3

गगनबावडा - 4 : सबकुछ काँग्रेसच

भाजप -

काँग्रेस -4

राष्ट्रवादी

शिवसेना

करवीर 24 - काँग्रेस, शिवसेना वाढून

भाजप - 2

काँग्रेस -4

राष्ट्रवादी -1

शिवसेना-2

शिरोळ 14 - काँग्रेस, स्वाभिमानी वाढून

भाजप - 3

काँग्रेस - 2

राष्ट्रवादी

शिवसेना

स्वाभिमानी - 2

हातकंणगले 22 - भाजप आघाडीवर 

भाजप - 3

काँग्रेस -1

राष्ट्रवादी -2

शिवसेना

पन्हाळा १२ राष्टआवादी आघाडीवर

भाजप -

काँग्रेस - 1

राष्ट्रवादी - 2

शिवसेना

जनसुराज्य

जिल्हा परिषद शाहूवाडी ८ भाजप काँग्रेस काटे की टक्कर 

भाजप - 2

काँग्रेस -2

राष्ट्रवादी -

शिवसेना -

जनसुराज्य -

भादोलेत काँग्रेस विजयी

भादोलेतून जि.प. निवडणुकीत काँग्रेसच्या सोनाली सावंत विजयी झाल्या आहेत. सोनाली सावंत या सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात.

वडणगेत बळीमार कळके आघाडीवर

वडणगे प. स. बळीराम कळके ७०० मतांनी आघाडीवर

राशिवडेत काँग्रेस आघाडीवर

राशिवडे ता . राधानगरी जि .प दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे सागर धुंदरे१०७ मतांनी आघाडीवर

आमदार विनय कोरेंना धक्का

आमदार विनय कोरे यांना बालेकिल्ल्यात धक्के बसले आहेत. घुणकी आणि सातवे जिल्हा परिषद मतदार संघ आणि पंचायत समितीत जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारांचा पराभव

भादोले मतदार संघावार देखील काँग्रेसची पकड

काँग्रेसनं बाजी पलटली, राष्ट्रवादीही जोमात 

काँग्रेसने कोल्हापूर जिल्हा परिषदेत मोठी मुसंडी मारली असून आतापर्यंत ते १० जागांवर आघाडवर आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजप ६, शिंदे शिवसेना ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस ८ जागांवर आघाडीवर आहे.

भाजपची मुसंडी

भाजपची पिछाडीवरून मुसंडी मारली आहे; शिंदे गट अन् राष्ट्रवादीही जोमात आहे. भाजप ६, शिंदे सेना ३ राष्ट्रवादी अजित पवार गट २ तर काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे.

काँग्रेसचे भारत पाटील विजयी 

पंचायत समिती नवे पारगावमध्ये भारत पाटील विजयी झाल्या आहेत तर घुणकी पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या संगिता संग्राम पाटील विजयी झाल्या आहेत.

काँग्रेसचा पहिला उमेदवार विजयी

हातगणंगले येथील काँग्रेसच्या शुभांगी कुंभार या विजयी झाल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत हा कोल्हापुरातील काँग्रेसचा पहिला विजय आहे.

शिरोळमध्ये महाविकास आघाडी आघाडीवर 

कोल्हापूर जिल्हा परिषद शिरोळ आलास गटामध्ये महाविकास आघाडीनं आघाडी घेतली असून दत्तवाडमध्ये भाजप आघाडीवर आहे.

काँग्रेस ३ जागांवर आघाडी 

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक निकालात काँग्रेसने ३ जागांवर आघाडी घेतली असून भाजप एका जागेवर आघाडीवर आहे. तरी राष्ट्रवादी अजित पवार गट २ जागेंवर आघाडीवर आहे.

दिग्गजांच्या नेतवाईकांची प्रतिष्ठा पणाला 

आ. राहुल आवाडे यांची कन्या सानिका, माजी आमदार राजीव आवळे यांचे पुत्र राहुल, माजी आमदार कै. नामदेवराव भोईटे यांचे पुत्र उमेश, दिनकरराव जाधव यांच्या स्नुषा शुभांगी, संपतराव पोवार-पाटील यांचे चिरंजीव क्रांतिसिंह, 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांची कन्या अमृता, विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन, 'गोकुळ'चे संचालक मुरलीधर जाधव यांचे चिरंजीव शिवाजी, राष्ट्रवादीचे मानसिंग गायकवाड यांच्या स्नुषा राजकुंवर गायकवाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक आप्पा पाटील यांचे चिरंजीव श्रीशैल जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात आपले नशिब आजमावत आहेत.

हातकणंगलेत मतमोजणीच्या जास्त फेऱ्या 

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सर्वाधिक १२ गट हे हातकणंगले तालुक्यात आहेत. त्यामुळं इथं मतमोजणीच्या जास्त फेऱ्या होणार आहेत.

सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरूवात

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज सकाळी १० वाजल्यापासून लागायला सुरूवात होईल. बरंचस चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरमध्ये निकालाआधीच अभिनंदनाचे बॅनर

गगनबावडामध्ये निकाल्याच्या आधीच आदल्या रात्री उमेदवारांचे अभिनंदनाचे बॅनर झळकले. रात्री काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी. गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषद तिसंगी गटातील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार कुमारी सोनाली विलास पाटील यांच्या विजयाचे फलक गगनबावड्यातील अनेक गावांमध्ये निकालाच्या आदल्या रात्री दिसू लागले आहेत.

गतवर्षीचं संख्याबळ किती?

१ जिल्हा परिषद (ZP) जागा?

६८

उमेदवार: जिल्हा परिषदेच्या जागांसाठी २४१ उमेदवार रिंगणात

२ पंचायत समिती जागा?

१२ पंचायत समित्यांमध्ये एकूण १३६ जागा

उमेदवार: पंचायत समितीच्या या जागांसाठी एकूण ४५५ उमेदवार रिंगणात

३. कोणाची प्रतिष्ठा पणाला?

  • सतेज पाटील (काँग्रेस)

  • हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी-अजित पवार गट)

  • प्रकाश आबिटकर (शिवसेना-शिंदे गट)

  • विनय कोरे (जनसुराज्य शक्ती)

  • समरजितसिंह घाटगे (भाजप)

  • चंद्रदीप नरके (शिवसेना शिंदे गट)

  • अमल महाडिक, धनंजय महाडिक (भाजप)

४. गेल्या निवडणुकीतले कोणाचं किती संख्याबळ?

२०१७ च्या निवडणुकीतील पक्षानुसार संख्याबळ

भाजप: १४

काँग्रेस: १४

राष्ट्रवादी काँग्रेस: ११

शिवसेना: १० जागा

इतर/अपक्ष/आघाडी: १८ ते १९ जागा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT